Bull Attack: आला नाही अंगावर, तरी घेतलं शिंगावर; अकोल्यात मोकाट जनावरांनी नागरिक हैराण, पाहा Video

Bull Attack In Akola: बैलाने त्यांना शिंगावर घेतलं आणि जवळच उभ्या असलेल्या ऑटो रिक्षावर फेकून दिलं.
Bull Attack In Akola
Bull Attack In Akolaजयेश गावंडे
Published On

अकोला: शहरात सध्या रस्त्यांवर जनावरे मोकाट फिरत आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण तर होतच आहे, पण यामुळे अपघातांची शक्यताही वाढली असून वाहचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. दरम्यान, अकोल्यात (Akola) एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. एका मोकाट बैलाने (Bull) एका माणसावर हल्ला केल्याचा हा व्हिडिओ आहे. या हल्ल्यात तो व्यक्ती जखमी झाला आहे. (Akola Latest News)

हे देखील पाहा -

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर उभा आहे. अन् रस्त्याहुन जाणाऱ्या एका मोकाट बैलाने अचानक त्या व्यक्तीवर हल्ला केला. मोकाट बैलाला अचानाक राग येतो, आणि तो बैल त्या व्यक्तीला शिंगावर (Bull Attack) घेऊन अक्षरशः फेकून देतो. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय, अकोला शहरातील खदान परिसरातील मुलानी चौकातला हा प्रकार आहे. शेख रहेमान शेख शफी असं या बैलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. घरासमोरील रस्त्यावर शेख रहेमान हे उभे होते. त्यावेळी रस्त्यावर जात असलेल्या बैलाने त्यांना शिंगावर घेतलं आणि जवळच उभ्या असलेल्या ऑटो रिक्षावर फेकून दिलं. यामुळे अकोल्यात मोकाट जनावरांचा नागरिकांना त्रास वाढत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com