beed News Saam Tv
महाराष्ट्र

एसपी पंकज कुमावत यांची मोठी कारवाई; १० चंदन तस्करांवर गुन्हा दाखल

बीडच्या महाजनवाडीत 599 किलो चंदनाचा गाभ्यासह 20 लाख 72 हजारांचा ऐवज जप्त...

विनोद जिरे

बीड - चंदन तस्करांना आयपीएस पंकज कुमावत यांनी चांगला दणका दिला आहे. बीडच्या (Beed) महाजनवाडी गावातून, तब्बल 599 किलो चंदनाच्या गाभ्यासह जवळपास 20 लाख 72 हजरांचा ऐवज जप्त केला आहे. बीडच्या महाजनवाडी गावातील काही जण, चंदनाची तस्करी करत असून त्यांनी शिवारातील शेतातील चंदनाची झाडे चोरून तोडून आणले आहेत आणि आणलेल्या झाडांची खोडे तासून त्यातील गाभा काढून चोरटी विक्री करत आहेत. अशी माहिती आयपीएस कुमावत यांना मिळाली होती.

हे देखील पाहा -

माहितीवरून पंकज कुमावत यांच्यासह टीमने महाजनवाडी गावात छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी चंदनाची खोडे तासीत असणारा अशोक रामहारी घरत रा . महाजनवाडी हा मिळून आला. यावेळी त्याच्या घराची झडती घेतली असता, 499 किलो चंदनाचा तासलेला गाभा , लाकडे वजन काटा वाकस व कुऱ्हाडी व बोलेरो पिकअप असा एकूण 20 लाख 72 हजार 700 रुपयाचा माल जप्त केला.

दरम्यान याप्रकरणी चंदन तस्कर अशोक घरत याच्यासह 10 जणांविरुद्ध बीडच्या नेकनूर ठाण्यात, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईने चंदन तस्करांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

PM Kisan Yojana: दसरा की दिवाळी? शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 कधी जमा होणार? PM किसानच्या हप्त्यावर अपडेट समोर

मोठी बातमी! रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबईचा कर्णधार, हार्दिक पांड्याचा पत्ता कट होणार?

High cholesterol: ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढलंय? दोन्ही समस्यांवर तूप ठरेल रामबाण उपाय, जाणून घ्या पद्धत

SCROLL FOR NEXT