Soygaon Taluka Indian Army Jawan Saam TV
महाराष्ट्र

Indian Army Jawan: सैन्यात भरती झालेला महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यातील जवान १३ वर्षांपासून गायब; गेला कुठे? आई-बाबा चिंतेत

Soygaon Taluka Indian Army Jawan: सोयगाव तालुक्यातील माळेगाव पिंपरी येथील रवींद्र भागवत पाटील हा तरुण सन २००५ मध्ये भारतीय सैन्यात भरती झालेला होता.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Soygaon Taluka Indian Army Jawan: कलेक्टर साहेब... सैन्य दलात भरती झालेला देशसेवा करत असलेला आमचा पोटचा गोळा परत आणून द्या हो... अशी आर्तहाक देत सोयगाव तालुक्यातील माळेगावा पिंप्री येथील वृद्ध दाम्पत्य थेट छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आले अन् तेथेच आमरण उपोषणाला बसले. (Breaking Marathi News)

सोयगाव तालुक्यातील माळेगाव पिंपरी येथील रवींद्र भागवत पाटील हा तरुण सन २००५ मध्ये भारतीय सैन्यात भरती झालेला होता, मात्र २०१० पासून तो आई-वडिलांच्या संपर्कात नसल्याने त्यांच्या आई-वडिलांनी याबाबत भारतीय सैन्य कार्यालयासोबत सतत आपल्या मुलाबाबत विचारणा केली.

मात्र त्यांना गेल्या १३ वर्षा पासून कार्यालयामार्फत योग्य ती माहिती मिळत नसल्याने आणि आपल्या मुलाचा शोध लागत नसल्यामुळे अखेर त्यांना न्याय मिळावा म्हणून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून आमरण उपोषणास बसले आहेत.

जवान रवींद्र भागवत पाटील हे पाच वर्षे जम्मूच्या सीमेवर देशसेवा करत होते. यावेळी त्यांचे कुटुंबियांसोबत बोलणे सुरू होते. २०१० मध्ये ते सुट्टीवर देखील आले. आई वडील आणि पत्नीची भेट घेवून पुन्हा कर्तव्यावर हजर झाले. मात्,र तेव्हा पासून त्याचा कुटुंबियांशी संपर्क बंद झाला. (Latest Marathi News)

दरम्यान २०१० पासून त्याचे वृद्ध आई वडील यांनी जम्मूच्या आर्मी कार्यालयात (Indian Army) संपर्क साधून शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र आर्मीच्या जम्मू कार्यालय ने त्यांना अनेक आश्वासन देऊन पिटाळून लावल्या चे जवानांचे वडील भागवत पाटील यांनी सांगितले. त्यानंतर आई वडिलांनी स्थानिक व जिल्हा पातळीवर अर्ज निवेदने दिली १३ वर्षे मुलाचा शोध घेण्यात भागवत पाटील (वय ७०) व बेबाबाई पाटील (वय६२) या दोघांचा कालावधी निघून गेला.

त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा तक्रारी दिल्या परंतु कोणतीही कारवाई होत नसल्याचे पाहून त्यांनी तेरा वर्षे मुलाचा शोध घेऊन अखेरीस थकवा आल्याने या वृद्ध दाम्पत्याने अखेर गुरुवारी (ता.१८) जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषण सुरू करून या ठिकाणी च मुलगा न मिळाल्यास देह त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Road Accident : ४८ तासांत 3 मोठे अपघात, 53 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Maharashtra Politics: 'मी रमीचा खेळाडू नव्हे, तर...'भाजपमध्ये प्रवेश करताच सांगळेंचा मंत्री कोकाटोंवर घणाघात

Maharashtra Live News Update: कोंढवा गणेश काळे हत्या प्रकरण; सोशल मीडियावर हत्येचं समर्थन करणारा व्हिडिओ पोस्ट

Daya Dongre: चित्रपटात आपला ठसा उमठवणाऱ्या दया डोंगरे निवडणार होत्या 'हे' करिअर; पण झाल्या अजरामर अभिनेत्री

Bihar Election: ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान RJDने आपल्याच उमेदवाराला पक्षातून काढलं? काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT