NEET coaching pressure turns fatal: Two students end their lives in separate incidents in Nagpur on the same day. saam TV News
महाराष्ट्र

आई-बाबा माफ करा! 'नीट'ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या, नागपूरमध्ये खळबळ

Two NEET aspirants die by suicide in Nagpur : नागपूरमध्ये नीट परीक्षेच्या तयारीच्या दडपणामुळे दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. वैदेही आणि ख्वाहिश या दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी आयुष्य संपवलं. या घटनेमुळे शिक्षण तणाव आणि मानसिक आरोग्यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur Latest News : नागपूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या, पण एकाच दिवशी घडल्यामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. हिंगणा आणि अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन जणांनी आयुष्याचा दोर कापला. १७ वर्षीय वैदेही आणि १६ वर्षाच्या ख्वाहिश यांनी आयुष्याचा दोर कापला. नीट परीक्षेत पास न झाल्याचा दबाव असल्यामुळे दोघांनी आयुष्य संपवल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आलेय.

१७ वर्षाच्या वैदेहीने आयुष्याचा दोर कापला -

हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना वानाडोंगरी येथील मंगलमूर्ती कॉलनीमध्ये १७ वर्षीय वैदेही अनिल उईके हिने आयुष्याचा दोर कापला. गेल्या वर्षभरापासून ती नीटची तयारी करत होती. तिचे वडील शहर पोलिसांत कार्यरत आहेत. तर मोठी बहीण एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. वैदेहीने यावर्षी नीट परीक्षेला बसली होती. पण, कमी गुण मिळाल्यामुळे ती पुन: परीक्षेसाठी तयारी करत होती. सोमवारी संध्याकाळी ७ वाजता वैदेही कोचिंग क्लासमधून घरी आली. तिच्या कुटुंबातील सदस्य बाहेर गेले होते. यावेळी तिने गळफास घेत आत्महत्या केली..

ख्वाहिशने हॉस्टेलमध्ये आयुष्य संपवलं -

अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामनगरमधील हिलटॉप येथील एका वसतिगृहात घडली. ख्वाहिश देवराव नागरे १६, देवटोला, बालाघाट असे मृतकाचे नाव आहे. ख्वाहिश नीटची तयारी करीत होता. तो हिलटॉप ले-आउट येथील एका कोचिंग क्लासमध्ये कोचिंग घेत होता. त्याचे कुटुंब बालाघाट येथे राहते. त्याने एक सुसाइड नोट लिहिली होती. त्यात 'माफ करा आई आणि बाबा, मी हे करू शकत नाही. गेल्या दीड आठवड्यापासून मला वाटत होते की, मी हे करू शकणार नाही. माफ करा. मला सर्व काही वेळेवर दिल्याबद्दल धन्यवाद अश्या पद्धतीची चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शुक्ल पंचमीनिमित्त आजचा शुभ दिवस; कोणत्या राशींना आर्थिक फायदा?

Maharashtra Live News Update : आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका - माजी मंत्री महादेव जानकर

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT