Gold Price Today  Saam TV
महाराष्ट्र

Gold Silver Rate : सोन्या-चांदीचे दर कडाडले, आता १० ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके रुपये

ऐन लग्नसराईच्या काळात सोने-चांदी दर वाढल्याने सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं आहे.

Satish Daud

Gold Silver Price Today : नुकतेच रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने रेपो रेट जाहीर केले आहेत. त्यामुळे कर्जाने हप्ते आणि लोन महाग झाले आहेत. आता त्यासोबतच सोन्या-चांदीचे दर देखील महाग झाले आहेत. सोन्याचे दर तर आवाक्याबाहेर जात आहेत. ऐन लग्नसराईच्या काळात दर वाढल्याने सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं आहे. (Latest Marathi News)

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold) दरात सातत्याने वाढ होत आहे. आज सोन्याच्या दरांनी आणखी एक रेकॉर्ड केला आहे. GST सोडून २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रतितोळा ५८ हजार ३० वर इतके झाले आहेत. दुसरीकडे GST आणि RTGS पकडून २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर हे ५८ हजार ७०० वर पोहोचले आहेत. याशिवाय २२ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव हा ५७ हजार ६६२ रुपयांवर पोहचला आहे.

आजचा चांदीचा भाव काय?

सोन्याबरोबर चांदीच्या (Silver) दरातही वाढ झाली आहे. बुधवारी सराफा बाजार उघडताच, चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली. १ किलो चांदीचा दर ७४ हजार रुपयांच्या पार गेला आहे. मंगळवारी सुद्धा चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. दरम्यान, येत्या काही दिवसांत चांदीच्या दरात आणखी तेजी येईल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आंतराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचा भाव काय?

भारतीय सराफा बाजाराप्रमाणेच आज आंतरराष्ट्रीय बाजारातही  सोन्या-चांदीच्या (Gold And Silver) दरात वाढ झाली. यूएस मध्ये, सोने 4.06 डॉलर्सने वाढून $1,872.36 प्रति औंस वर व्यापार करत आहे, तर चांदी 0.09 डॉलर्स घसरून $22.19 प्रति औंसवर व्यवहार करत आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखीच घसरण होण्याची शक्यता आहे.

शुद्ध सोने कसे ओळखावे?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अ‍ॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अ‍ॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT