PM Modi jacket: पीएम मोदींच्या स्पेशल जॅकेटची सर्वत्र चर्चा! काय आहे कारण...

PM Modi jacket: पीएम मोदींच्या या खास जॅकेटचे कापड तामिळनाडूतील करूर येथील श्री रेंगा पॉलिमर्स या कंपनीने तयार केले आहे.
PM Modi jacket
PM Modi jacketsansad tv

PM Modi jacket: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देणार आहेत. लोकसभेत दुपारी तीन वाजता त्यांचे भाषण सुरू होण्याची शक्यता आहे. याआधी ते संसदेत खास निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसले होते. पंतप्रधानांचे हे जॅकेट कापडाचे नसून प्लास्टिकच्या बाटल्यांच्या रिसायकल करून बनवले गेले आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सोमवारी बंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या इंडिया एनर्जी वीकमध्ये हे खास जॅकेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिले. हे पीईटी बाटल्यांपासून बनवले जाते. इंडिया एनर्जी वीकचा उद्देश ऊर्जेच्या परिवर्तन काळात महासत्ता म्हणून भारताची वाढती शक्ती प्रदर्शित करणे हा होता. प्लास्टिकचा पुनर्वापर करून बनवलेल्या या जॅकेटची बाजारातील किंमत फक्त 2000 रुपये आहे. (Latest Marathi News)

PM Modi jacket
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या गाडीवर एकही दगड फेकला गेला नाही, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा मोठा दावा

कसे बनवले गेले हे खास जॅकेट?

पीएम मोदींच्या या खास जॅकेटचे कापड तामिळनाडूतील करूर येथील श्री रेंगा पॉलिमर्स या कंपनीने तयार केले आहे. या कंपनीने पीईटी बाटल्यांपासून बनवलेले 9 वेगवेगळ्या रंगाचे कपडे इंडियन ऑईलला पाठवले होते. यातून पीएम मोदींसाठी चंदनाच्या रंगाचे कापड निवडण्यात आले. यानंतर हे कापड गुजरातमध्ये असलेल्या मोदींच्या टेलरकडे पाठवण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी हे जॅकेट तयार केले.

PM Modi jacket
Uddhav Thackeray: निवडणूक आयोगाआधी सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली काढावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन

किती बाटल्यांचा करण्यात आला वापर?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे एक जॅकेट तयार करण्यासाठी सुमारे 15 बाटल्यांचा वापर करण्यात आला. असा पूर्ण ड्रेस तयार करण्यासाठी सुमारे 28 बाटल्या आवश्यक असतात. रंग देण्यासाठी पाण्याचा वापर केला जात नाही. हे जॅकेट तयार करण्यासाठी सर्वप्रथम फायबर तयार केले जाते, नंतर त्याचे फॅब्रिकमध्ये रूपांतर होते आणि शेवटी ड्रेस तयार केला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com