police investigation in sangli Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही, मुलाने केली माजी सैनिक वडिलांची हत्या

सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

विजय पाटील

सांगली : जिल्ह्यात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दारू पिण्यासाठी मुलाने वडिलांकडे जास्त पैशांची मागणी केली होती. परंतु, वडिलांनी नकार दिल्याने मुलाने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात स्टूल घालून हत्या केली. आप्पासो कृष्णा तोरवे (६५) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. आप्पासो पेशाने सैनिक होते. तर प्रमोद आप्पासो तोरवे असं हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. ही भयंकर घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी गावात घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपी प्रमोदला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे. (Son kills father in sangli)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रमोदने दारू पिण्यासाठी वडिलांकडे पैशांची मागणी केली होती.पण वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने वडिलांवर स्टूलने हल्ला केला. वडिलांना पेन्शनचे पैसे मिळाल्याने प्रमोदने त्यांच्याकडे पैसे मागितले होते. मुलाने क्षुल्लक कारणावरून वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट; होडगी रोड पाण्याखाली

पार्कमध्ये काँग्रेस नेत्याची हत्या; बॅटनं मारलं अन् गोळ्या झाडल्या, CCTVतून मारेकऱ्याची ओळख पटली

Cancer Alert: आताच सावध व्हा! नकळत या गोष्टींमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

Who is Petal Gahlot: जगासमोर पाकच्या पंतप्रधानांचे तोंड बंद केलं, खडेबोल सुनावणाऱ्या पेटल गहलोत कोण आहेत?

Vastu Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडतात? जाणून घ्या शास्त्र

SCROLL FOR NEXT