Solapur : पतीच्या निधनाचे दुःख असह्य झाल्याने पत्नीची आत्महत्या! भारत नागणे
महाराष्ट्र

Solapur : पतीच्या निधनाचे दुःख असह्य झाल्याने पत्नीची आत्महत्या!

पतीच्या निधनाचा धक्का पत्नी अनुसया यांना सहन न झाल्यामुळे त्यांनी सोलापूर-पुणे या रेल्वे मार्गावर जाऊन रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली.

भारत नागणे

पंढरपूर : पतीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्यामुळे पत्नीने सोलापूरात रेल्वे खाली उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत पती पत्नी दोघेही मंगळवेढा तालुक्यातील शरद नगर येथील आहेत.

हे देखील पहा :

आप्पासो रावसाहेब कोरे (वय.38 ), अनुसया आप्पासो कोरे ( वय.33 ) असं मृत पती-पत्नीचे नाव आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी आप्पासो कोरे यांना निमोनिया सदृश्य आजार झाल्यामुळे सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान त्यांचे आज पहाटे 5 च्या सुमारास निधन झाले. पतीच्या निधनाचा धक्का पत्नी अनुसया यांना सहन न झाल्यामुळे त्यांनी सोलापूर-पुणे या रेल्वे मार्गावर जाऊन रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली.

पतीच्या उपचारा दरम्यान झालेला खर्च व पतीला वाचण्यात आलेले अपयश या कारणांनी व भविष्यातील जगण्याचा आधार हरपल्यामुळे मानसिक धक्का सहन न झाल्याने पतीबरोबर पत्नीने जगाचा निरोप घेतला. कोरे दाम्पत्याला एक पाच वर्षाचा मुलगा असून या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी प्रल्हाद चव्हाण हे करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray reaction : काय चुकलं? पराभवानंतर राज ठाकरे निराश, व्यक्त केले दु:ख; म्हणाले, दोन्ही...

Shani Mantras For Success In Job: नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवीये? शनिदेवाच्या 'या' मंत्राचा करा जप

Maharashtra Live News Update : आता लक्ष महापौरपदाच्या आरक्षणाकडे; गॅझेट प्रक्रिया सोमवारपासून

Nail Care At Home : नखं वाढवल्यावर तुटतात? मग नखं मजबूत करण्यासाठी वापरा 'हे' घरगुती उपाय

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरचं टी-20 मध्ये कमबॅक! सिरीजपूर्वीच BCCI कडून टीम इंडियामध्ये दोन मोठे बदल

SCROLL FOR NEXT