Solapur, Water Supply Saam TV
महाराष्ट्र

Solapur : साेलापूरातील पाणीपूरवठ्याबाबत महापालिकेचा महत्त्वपूर्ण बदल; जाणून घ्या कारण

या कालावधीत पाणीपुरवठा चार दिवसाआडदेखील उशिरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विश्वभूषण लिमये

Solapur Muncipal Corporation News : स्काडा नियंत्रण प्रणालीच्या कामासाठी साेलापूर (solapur latest news) महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पुढील २५ दिवसासाठी शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार २५ दिवस ज्या भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा (solapur water supply) होणार आहे, त्या भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने (solapur muncipal council) कळविले आहे.

सोलापूर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्काडा नियंत्रण प्रणालीचे काम प्रगतिपथावर आहे. या योजनेंतर्गत उजनी जलवाहिनी, पाकणी जलशुद्धिकरण केंद्र, सोरेगाव जलशदिकरण केंद्र, भवानी पेठ जलशुद्धिकरण केंद्र आणि टाकळी जलवाहिनी येथे विविध प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. ही कामे तातडीने पूर्ण होण्यासाठी वेळोवेळी शटडाऊन राहणार आहे.

यामुळे सोलापूर शहरातील पाणीपुरवठा १० फेब्रुवारीपासून ते पुढील 24 दिवसांपर्यंत तीनऐवजी चार दिवसांनंतर पाणीपुरवठा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही, शिवाय काही भागात दूषित पाणीपुरवठाही होत आहे. याबाबतच्या तक्रारी नागरिक महापालिकेकडे करीत आहे.

दरम्यान,चार दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठा कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे महापालिकेने सांगितले असले तरी या कालावधीत पाणीपुरवठा चार दिवसाआडदेखील उशिरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य कराव असं आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आल आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT