Solapur Water Crisis News:  Saamtv
महाराष्ट्र

Solapur News: भीषण दुष्काळ, शेतीला पाणी नसल्याने बळीराजा हतबल; ८ एकरातील द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड

Solapur Water Crisis News: शेतीला पाणी नसल्याने शेतकरी संतप्त झाले असून सरकारने दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापुर, ता. २५ मे २०२४

भयंकर दुष्काळ, पाणीटंचाईमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीला पाणी नसल्याने उभे पीक वाळून जात असल्याची विदारक परिस्थिती राज्यातील अनेक भागांमध्ये आहे. याच दुष्काळाच्या झळा सोलापुर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर बसताना दिसत असून शेतीला पाणी नसल्याने तब्बल आठ एकरावरील द्राक्ष बाग शेतकऱ्याने तोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

राज्यातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होताना दिसत आहे. राज्यातील ४० तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळाची स्थिती असून विदर्भ, मराठवाड्यात सर्वाधिक पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. अशातच सोलापुरमध्ये शेतीला पाणी नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने द्राक्ष बाग तोडून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील ही घटना असून पाणी नसल्याने रणजित चौगुले या शेतकऱ्याने आपली ८ एकरावरील द्राक्ष बाग तोडून टाकली आहे. शेतीला पाणी नसल्याने शेतकरी संतप्त झाले असून सरकारने दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत, आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

"आमच्या गावात भीषण दुष्काळ आहे. गावात प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही. त्यामुळे लेकराप्रमाणे जगवलेल्या बागेला आज आम्हाला कुऱ्हाड आणि कोयता लावावा लागतोय. सरकारने याकडे लक्ष द्यावे, शेतकरी सदन जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करावेत," अशी विनंती या शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

IPL 2026: पराभवाच्या धक्क्यानंतर मुंबई इंडिन्यसला मिळाली आनंदाची बातमी; अष्टपैलू खेळाडूची संघात वापसी

Crime: अशोक खरातनंतर आणखी एका भोंदूचा कारनामा, फार्म हाऊसवर बोलावलं, भूतप्रेत उतरवतो सांगून महिलेवर बलात्कार

Maharashtra Live News Update: हार्बर मार्गावरील नेरूळ जुईनगर स्थानक दरम्यान तांत्रिक बिघाड, लोकल सेवा विस्कळीत

अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; पत्रात गर्भलिंगनिदान प्रकरणात रुपाली चाकणककरांचे नाव, खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT