Manasvi Choudhary
आजकाल डायबिटीजची समस्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. तरूणवयातही मधुमेहाचा सामना करावा लागत आहे.
लठ्ठपणा हे मधुमेहाचे मुख्य कारण मानले जाते. याशिवाय चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आहार जीवनशैलीमध्ये बदल केल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवणे सोपे होते.
डायबिटीजच्या रूग्णांनी आंबा या फळाचे सेवन करू नये. अनेकांना आंबा खायला आवडतो. मात्र आंबा या फळामध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण अधिक असते.
द्राक्षे या फळामध्ये जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे शरीराला फायदा होतो मात्र मधुमेहाच्या रूग्णांसाठी द्राक्षे घातक आहेत. रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
केळी शरीराला ऊर्जा देणारे फळ आहे. केळी खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते मात्र केळीचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने केळी खाणे टाळा.
चेरी हे दिसालया लहान फळ असले तरी चेरीमध्ये ग्लुकोजचे प्रमाण अधिक असते यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी चेरी खाऊ नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.