Manasvi Choudhary
पावसाळ्यात केस गळणे, केसांत कोंडा होणे, केस कोरडे होणे या समस्याांवर अनेकजण घरगुती उपाय करतात.
कांद्याचा रस केसांसाठी वापरला जातो. कांद्याच्या रसमधील गुणधर्मामुळे केसांना कसा फायदा होतो ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
१) कांद्यामध्ये असणारे सल्फर टाळूवरील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस गळती कमी होते.
२) कांद्याचा रस करून केसांना लावल्याने केसांना पोषण मिळते नवीन केस उगवण्यास सुरूवात होते.
३) कांद्यामधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे टाळूवरील इन्फेक्शन आणि कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
४) कांद्याचा रस नियमितपणे केसांना लावल्याने केस मजबूत, मऊ आणि चमकदार बनतात.
१) २ कांदे घ्या. त्यांची साल काढून स्वच्छ धुवा.
२) त्यानंतर कांद्याचे बारीक बारीक तुकडे करा. हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात बारीक करा.
३) त्यानंतर तयार झालेली कांद्याची पेस्ट सुती कापडामध्ये किंवा गाळणीने गाळून त्याचा रस निघेल.
कांद्याचा रस लावताना कापसाचा गोळा किंवा बोटांच्या सहाय्याने केसांच्या मुळाशी आणि टाळूवर लावा. हलक्या हाताने ५ ते १० मिनिटे मसाज करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.