solapur news  Saam tv
महाराष्ट्र

सोलापूर हादरलं! राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह, दोन मुली पोरक्या झाल्या

Solapur crime news : सोलापुरात राहत्या घरात पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याची घटना घडली. दोघांच्या मृत्यूने दोन मुली पोरक्या झाल्या आहेत.

विश्वभूषण लिमये

सोलापूरमध्ये पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू झालाय

सोलापूरच्या कलावती नगर दोघांच्या मृत्यूने खळबळ

दोघांची आत्महत्या की घातपात, पोलिसांचा तपास सुरू

सोलापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील कलावती नगरात राहत्या घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले आहेत. दोघेही तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोघांची आत्महत्या आहे की घातपात याबाब संशय निर्माण स्थानिकांमध्ये निर्माण झाला आहे.

सोमनाथ धानप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील असे मृत आढळलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घरात पती-पत्नीसह दोन मुलीही होत्या. मात्र सकाळी आई-वडील झोपेतून उठत नव्हते. त्यामुळे दोन्ही मुलींनी काकांना फोन करुन ही घटना सांगितली. त्यानंतर दोघांनाही शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दोघांच्या मृतदेहाजवळ एक चिट्ठी सापडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी त्याबाबत दुजोरा दिलेला नाही.एमआयडीसी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दोघांच्या मृत्यूने कलावती नगरात शोककळा पसरली आहे.

त्या दिवशी काय घडलं?

सोमनाथ धानप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील या दोघांनी गुरुवारी रात्री दोन मुलींसह जेवण करून झोपी गेले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी दोन्ही पती-पत्नीच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे दोन्ही मुलींनी त्या उठवलं. परंतु आई-वडिलांच्या तोंडात फेस आल्याने दोन्ही मुली घाबरल्या.

दोन्ही मुलींनी तातडीने काकांना फोन केला. त्यानंतर त्यांनी दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोघांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनसेचा मेळावा; राज ठाकरे DJवर बोलणार?

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासोबतच HRA मध्येही मोठा बदल

Bread-Omelette : नाश्त्यात रोज ब्रेड-ऑम्लेट खाणं आरोग्यासाठी चांगलं की धोकादायक? आताच जाणून घ्या

Birthday Gift for Girlfriend: गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाला द्या सरप्राईज गिफ्ट; 'ती' होईल खुपच खूश

Palghar : शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखासह ११ जणांवर गुन्हा, पालघरमध्ये हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण भोवलं

SCROLL FOR NEXT