Former Shiv Sena Leader Shivaji Sawant Saam TV News
महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा गड ढासळला; शिंदेंच्या शिवसेना आमदाराचे बंधू भाजपात जाणार, ४० बड्या नेत्यांनीही दिली साथ

Former Shiv Sena Leader Shivaji Sawant: शिवसेना नेते शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश निश्चित. ४० पदाधिकाऱ्यांनीही एकत्रितपणे राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. जयकुमार गोरे यांनी अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला.

Bhagyashree Kamble

  • शिवसेना नेते शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश निश्चित.

  • ४० पदाधिकाऱ्यांनीही एकत्रितपणे राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.

  • जयकुमार गोरे यांनी अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला.

  • स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेला मोठा धक्का बसला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातीला राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. फोडाफोडीचं राजकारण आणि पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहे. अशातच सोलापुरात शिवसेनेला खिंडार पडणार हे निश्चित झालं आहे. आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आणि सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला आहे.

शिवसेना शिंदे पक्षाला सोलापुरात मोठं खिंडार पडणार आहे. शिवाजी सावंत यांच्या रूपाने भाजपने शिंदे सेनेचा एक मोठा नेता गळाला लावला आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यात मोठा कार्यक्रम आयोजित करून शिवाजी सावंत यांचा पक्षप्रवेश करण्यात येणार आहे.

शिवाजी सावंत यांच्यासह इतर नेतेही संपर्कात असल्याचा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, शिवाजी यांच्यासोबत अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. माजी आमदार दिलीप माने, मोहोळ तालुक्यातील अजित पवार पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. यामुळे भाजपकडून महायुतीतील मित्रपक्षांचे नेते खेचून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

सोलापुरातील शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या शिवाजी सावंत यांनी गटबाजीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं सांगितलं. त्यांच्यासह सोलापूर शहर जिल्ह्यातील शिवसेनेच्या चाळीस पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. हे सर्व पदाधिकारी शिवाजी सावंत यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मित्र पक्षातीलच नेतेमंडळीला गळाला लावण्याचे काम सुरू आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढतानाचे एकूणच चित्र दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळे विधानसभेच्या मतदार यादीत तब्बल 45 हजार बोगस मतदारांची नावे समाविष्ट - माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप

Khajjiar Tourism: लॉंग ट्रिप प्लॅन करताय? भारतातच आहे मिनी स्वित्झर्लंड, परदेशवारीचं स्वप्न होईल पूर्ण

Methi Water Benefits: मेथीचे पाणी रोज प्यायल्यास काय होते? मेथीचे पाणी नक्की कधी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: जळगावमध्ये ठाकरे गटाला सुरुंग; 13 माजी नगरसेवकासह माजी महापौर हाती घेणार कमळ

GK : DATE शब्दाचा फुल फॅार्म काय? 99% लोकांना माहित नसेल

SCROLL FOR NEXT