'या' अभिनेत्रीवर जडलेला गोविंदाचा जीव; सुनीतासोबत नातं तोडायला तयार झाला होता, कोण होती ती अभिनेत्री?

Govinda and Sunita Ahuja: गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्यात मतभेद शिगेला. ३८ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटाच्या चर्चांना उधाण. सोशल मीडियात गोविंदाच्या गर्लफ्रेंड आणि नीलम कोठारीसोबतच्या रिलेशनशिपची चर्चा.
Govinda Sunita Divorce
Govinda Sunita DivorceSaam Tv
Published On
Summary
  • गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्यात मतभेद शिगेला.

  • ३८ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटाच्या चर्चांना उधाण.

  • सोशल मीडियात गोविंदाच्या गर्लफ्रेंड आणि नीलम कोठारीसोबतच्या रिलेशनशिपची चर्चा.

  • बॉलिवूडच्या हिरो नंबर 1 गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत.

बॉलिवूडचा हिरो नंबर गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी सुनीता आहुजा आणि गोविंदामधील मतभेद प्रचंड वाढले आहेत. आता दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपू्र्वी गोविंदा आणि सुनीताच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच गोविंदाच्या गर्लफ्रेंडची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. एकेकाळी बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीवर गोविंदाचा जीव जडला असल्याची माहिती आहे.

कुणाच्या प्रेमात गोविंदा झालेला वेडापिसा?

बॉलिवूड कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात गोविंदा अभिनेत्री नीलम कोठारीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यानं स्वत: एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला. १९९० साली स्टारडस्ट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने म्हटलं की, ' मी तिला जितकं (नीलम कोठारी) ओळखत गेलो, तितकीच मला ती आवडत गेली. ती अशी सुंदर महिला होती. जिच्यावर कोणताही पुरूष अगदी भाळू शकतो', असं गोविंदा म्हणाला.

Govinda Sunita Divorce
शत्रूला भरणार धडकी! ऑपरेशन सिंदूरनंतर अवघ्या ३ महिन्यांत नवी एअर डिफेन्स सिस्टम; एकाचवेळी ३ टार्गेट्सवर साधणार निशाणा | VIDEO

गोविंदानं सुनीता अहुजासोबत लग्नगाठ बांधली. त्यावेळी त्यानं आपलं लग्न लपवून ठेवलं होतं. नीलमपासूनही त्यानं लग्न लपवून ठेवलं असल्याची माहिती आहे. गोविंदाला नीलमसोबत लग्न करायचं होतं. त्यानं सुनीताला काडीमोड देण्याचा निर्णयही घेतला होता. पण नंतर काही कारणास्तव त्यांचं नातं संपुष्टात आलं.

Govinda Sunita Divorce
..तर PM-CMची खूर्ची जाणार; १३० व्या घटनादुरूस्ती विधेयकेवर अमित शहा काय म्हणाले?

गोविंदानं नंतर सुनीतासोबत संसार थाटला. दोघांच्या लग्नाला ३८ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, ३८ वर्षानंतर त्यांच्या काडीमोडची चर्चा होत आहे. आता दोघेही दोन मुलांचे पालक आहेत.

Govinda Sunita Divorce
'मतं चोरली, विरोधक अन् सत्ताधाऱ्यांकडून एकच आरोप'; राज ठाकरेंची AUDIO क्लिप व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com