FARMER UPROOTS 2-ACRE MUSKMELON CROP AMID WATER CRISIS saam tv
महाराष्ट्र

पावसाने पाठ फिरवली, पिकांनी माना टाकल्या! दोन एकर खरबूज उपसून टाकण्याची वेळ; बळीराजा हतबल

Sangola Drought Situation Impact On Muskmelon Crops: सांगोल्यात गेल्या ५० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. टँकरचे पाणीही अपुरे पडल्याने बंडगरवाडी येथील शेतकऱ्याला दोन एकर फळावर आलेले खरबूज उपसून टाकावे लागले आहे.

Omkar Sonawane

भरत नागणे, साम टीव्ही

गेल्या 50 दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाने पाठ फिरवल्याने सांगोल्याची दुष्काळी स्थिती अधिकच गंभीर होऊ लागली असून पावसाच्या आशेवर टँकर मागून वाढविलेली पिके आता उपसून टाकण्याची वेळ बळीराजावर येऊ लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला हा कायम दुष्काळी तालुका अशी ओळख असून यावर्षी खऱ्या अर्थाने अलनिनोचा दणका सांगोल्याला बसला आहे. जवळपास 50 दिवसापेक्षा जास्तकाळ पावसाने पाठ फिरवल्याने पावसाच्या आशेवर लावलेली पिके आता माना टाकू लागली आहेत.

सुरुवातीला काही दिवस पावसाच्या आशेवर हजारो रुपये खर्चून टँकरने ही पिके आणि बागा जीवंत प्रयत्न करण्यात आला. मात्र, पाऊस पूर्णच ठप्प झाल्याने बळीराजा हतबल होऊन शेतात लावलेल्या बागा आणि पिके उपसून टाकू लागला आहेत. एका बाजूला जनावरे आणि मेंढ्या जगवणे अवघड झाले असताना आता शेतातील पिके ही हातातून चालली आहेत. बंडगरवाडी येथील नवनाथ बंडगर याने शेतात दोन एकर खरबुजाची लागवड केली होती.

गेल्या वर्षी पावसाने साथ दिल्याने चांगले उत्पन्न मिळाले होते. याच आशेवर याही वर्षी खरबूजातून उत्पन्न येईल अशी आशा असताना निसर्गाच्या कृपेमुळे खरबूजाचे उभे पीक उपसून टाकण्याची वेळ नवनाथ यांच्यावर आली आहे. टँकरने पीक जगवने अवघड असल्याची जाणीव झाल्यानंतर अखेर मजूर लावून नवनाथ याने आपल्या शेतातील फळाला आलेले दोन एकर खरबूज उपसून टाकल आहे. अशीच परिस्थिती तालुक्यात अनेक ठिकाणी दिसत असून सध्या विविध गावात आठ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. अजूनही टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत असून किमान आता तरी पाऊस येईल या आशेवर अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT