वंदे भारत  Saam Tv
महाराष्ट्र

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Solapur Vande Bharat Train : सोलापूर–पुणे–मुंबई वंदे भारतमध्ये बोगींची संख्या १६ वरून २० करण्याचा निर्णय घेतला आहे. २८ ऑगस्ट २०२५ पासून ही वंदे भारत २० डब्यांसह धावणार आहे.

Namdeo Kumbhar

  • सोलापूर–पुणे–मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता २० डबे असणार आहेत.

  • २८ ऑगस्ट २०२५ पासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे.

  • प्रवासात होणारी गर्दी टळेल आणि तिकीट उपलब्धता वाढेल.

  • गाडीच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही.

  • नवीन थांबा म्हणून दौंड स्थानकाची भर पडली आहे.

Solapur-Pune-Mumbai Vande Bharat Train : सोलापूर-पुणे-मुंबई असा वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सीएसएमटी-सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस आता २० डब्यांची होणार आहे. सध्या मुंबई-सोलापूर या मार्गावर १६ डब्ब्यांची वंदे भारत एक्सप्रेस धावतेय. गेल्या काही दिवसांपासून पुणे-सोलापूर या मार्गावर प्रवास करणाऱ्यांकडून बोगींची संख्या वाढवण्याची मागणीन जोर धरला होता. या मागणींना यश आले असून लवकरच आता २० बोगींची वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. त्यामुळे सोलापूर-पुणे-मुंबई असा वंदे भारतने प्रवास करताना गर्दीचे टेन्शन संपणार आहे, त्यामुळे तिकिटही सहजासहजी उपलब्ध होईल. (Solapur Pune Mumbai Vande Bharat 20 coach update)

सोलापूर-पुणे-मुंबई या महाराष्ट्रातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दररोज शेकडो लोक प्रवास करतात. या वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्यासाठी सहा महिन्यांपासून प्रवाशांकडून मागणी करण्यात येत होती. कमी कालावधीत जास्त वेगवान प्रवास होत असल्यामुळे प्रवाशांनी बोगींची संख्या वाढवा, अशी मागणी केली होती. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे आणि या एक्स्प्रेसच्या लोकप्रियतेमुळे रेल्वे बोर्डाकडे केंद्राकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून आता २० डब्यांसह वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याची माहिती माहिती रेल्वेने दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे, सोलापूर-पुणे-मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नियोजित वेळेनुसारच २० डब्ब्यांची वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे.

अंमलबजावणी कधी?

मुंबई-सोलापूर आणि सीएसएमटी-शिर्डी या वंदे भारत एक्सप्रेस राज्यात एकाच दिवशी सुरू झाल्या होत्या. सोलापूर-मुंबई व्हाया पुणे या वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दररोज शेकडो प्रवाशी ये जा करतात. ऑगस्ट महिन्यापासून सोलापूर-मुंबई मार्गावर २० बोगींची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्टपासून मुंबई – सोलापूर मार्गावर २० डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस धावेल. वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, नियोजित वेळेनुसार, ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे.

थांबे (Stops) :

सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 22225/22226) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई, दादर (Dadar), कल्याण (Kalyan), पुणे (Pune), कुर्डूवाडी (Kurduwadi), सोलापूर (Solapur) आणि 27 जुलै 2025 पासून दौंड स्थानकावर नवीन थांबा जोडला गेला आहे.

वेळापत्रक (Timetable) :

मुंबई ते सोलापूर (ट्रेन क्र. 22225):

प्रस्थान: CSMT येथून दुपारी 4:05 वाजता

आगमन: सोलापूर येथे रात्री 10:40 वाजता

सोलापूर ते मुंबई (ट्रेन क्र. 22226):

प्रस्थान: सोलापूर येथून सकाळी 6:05 वाजता

आगमन: CSMT येथे दुपारी 12:35 वाजता

सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक काय आहे?

ही वंदे भारत ट्रेन सोलापूरहून सकाळी 6:05 वाजता सुटते आणि दुपारी 12:35 वाजता मुंबई (CSMT) येथे पोहोचते. मुंबईहून सायंकाळी 4:05 वाजता सुटते आणि रात्री 10:40 वाजता सोलापूरला पोहोचते. ही ट्रेन बुधवारी (मुंबईहून) आणि गुरुवारी (सोलापूरहून) वगळता आठवड्याचे 6 दिवस धावते.

सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर किती आहेत?

चेअर कारचे भाडे (कॅटरिंगसह) सोलापूरहून मुंबईला 1150 रुपये आणि मुंबईहून सोलापूरला 1300 रुपये आहे. एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे (कॅटरिंगसह) 2125 रुपये (सोलापूरहून) आणि 2365 रुपये (मुंबईहून) आहे. कॅटरिंगशिवाय भाडे अनुक्रमे 1010 रुपये आणि 2015 रुपये आहे.

सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या स्थानकांवर थांबते?

सोलापूर-मुंबई वंदे ट्रेन दादर, कल्याण, पुणे, दौंड आणि कुर्डूवाडी येथे थांबते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule News : ४४० किलो गांजा, किंमत दीड कोटी; ड्रग्ज माफियांचा पोलिसांनी केला पर्दाफाश, २४ वर्षांच्या तरुणाला बेड्या

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवाजीनगरमध्ये उद्या पाणी बंद

Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या फार्महाऊसवर कोणते राजकीय नेते, VIP जायचे? SIT चौकशीत सगळ्यांची नावं उघड

Heart Shape Mangalsutra : नवरा- बायकोच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या हार्ट शेप मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न

Fast lifestyle: तुम्हीही सतत घाईत असता? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञांच इशारा

SCROLL FOR NEXT