Solapur Pune Highway Accident News  Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरला कारची जोरदार धडक, वाहनांचा चक्काचूर

Solapur Pune Expresshighway Accident Update News : सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजवळील सापटणे हद्दीत कारची कंटेनरला जोरदार धडक. एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी.

Alisha Khedekar

  • सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात

  • कारची कंटेनरला जोरदार धडक

  • भीषण अपघातात एकाचा मृत्यू २ जण गंभीर

  • अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजवळील सापटणे हद्दीत कंटेनरला पाठीमागून कारने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मोहोळ येथील कर्ण पवार या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अनिकेत धोत्रे आणि रोहित मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मोडनिंबजवळील सापटणे हद्दीत एचपी पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. कारने समोरून जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की, कारचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर कार कंटेनरखाली अडकल्याने त्यामधील तिन्ही जण अडकून पडले होते.

अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त जीप बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर कारचे दरवाजे तोडून तिन्ही जखमींना बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेतील तिघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कर्ण पवारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, अनिकेत लक्ष्मण धोत्रे आणि रोहित विजय मोरे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महामार्गावर वेगाने होणारी वाहतूक आणि अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने वाहनचालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सोलापूर ग्रामीण पोलीस करत आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT