Ex MLA Ramesh Kadam  Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Politics: ...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही, शरद पवार गटाच्या नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

NCP Sharad Pawar Group Ex MLA Ramesh Kadam : रमेश कदम यांना रिव्हॉल्वर लावून अपहरण करून पुण्यात नेण्याबाबतचा ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप समोर आली असून पोलिस यावरून तपास करत आहेत.

Priya More

विश्वभूषण लिमये, सोलापूर

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या. त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी उमेदवार आणि नेत्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक केल्याची घटना ताजी असतानाच सोलापूरमध्ये शरद पवार गटाच्या माजी आमदाराला धमकी आली आहे. शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रकार ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपद्वारे उघड झाले आहे.

रमेश कदम यांना रिव्हॉल्वर लावून अपहरण करून पुण्यात नेण्याबाबतचा ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप पोलिसांच्या ताब्यात आहे. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण करण्यासाठी पुण्यातील आबा काशीद नामक व्यक्तीने सुपारी दिली असल्याची माहिती समोर आली. मोहोळ येथील आकाश बाबर आणि धनराज भोसले नामक युवकांना रिव्हॉल्वर, गाडी आणि पैसे दिल्याचे उघड झाले आहे. गेल्या १५ दिवसांत रमेश कदम यांच्याबाबत दुसऱ्यांदा हा प्रकार पाहायला मिळाला आहे.

या प्रकरणी ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आकाश बाबर आणि धनराज भोसले या आरोपींना मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर मुख्य सूत्रधार आबासाहेब काशीद याचा पोलिसांकडून शोध सुरु असून तीन पथकं त्याच्या मागावर आहेत. आरोपींवर रिव्हॉल्वर दाखवून खंडणी मागणे किंवा जीवे मारण्यासाठी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहिता कलम 140(2), 140(3),62, 3 कलमांतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान माझ्या जीवितास धोका असून मागील पंधरा दिवसांत हा दुसऱ्यांदा हल्ल्याचा प्रकार घडला आहे. 'माझी पोलिस प्रशासनाला विनंती आहे मला पोलिस सुरक्षा मिळावी अन्यथा माझा बाबा सिद्दीकी व्हायला वेळ लागणार नाही.', अशी प्रतिक्रिया रमेश कदम यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vinod Tawde Money Distribution : १५ कोटी वाटल्याचा तावडेंवर आरोप, विरोधक म्हणतात मान्य करा; भाजप म्हणाले, पैसे वाटायला जातीलच का

Health Tips: हिवाळ्यात भाजलेले हरभरे खा; 'हे' आजार राहतील कोसो दूर

International Men's Day 2024: सावधान; 'या' आजारचे पुरुष ठरू शकतात बळी...

Mathira Viral Video: टिकटॉक स्टार इम्शा रहमानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS लीक; व्हिडीओ होतोय व्हायरल

Maval Vidhan Sabha : मावळचा गड यंदा कोणाकडे?; महायुतीतील राष्ट्रवादीसोबत अपक्षांची झुंज, आघाडीही अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी

SCROLL FOR NEXT