Former Solapur mayors joining the Ajit Pawar-led NCP in the presence of Agriculture Minister Dattatray Bharane. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश

Solapur Politics: सोलापूर महापालिका निवडणुकीपूर्वी शरद पवार गटातील दोन माजी महापौरांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Bharat Jadhav

  • सोलापुरात शरद पवार गटाला ऐन निवडणुकीत मोठा धक्का

  • दोन माजी महापौरांचा अजित पवार गटात प्रवेश

  • दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादींच्या युती तुटली असल्याची चर्चांनी वेग धरला. एकीकडे शरद पवार गटाच्या नेत्यांकडून युती होणार नसल्याच म्हटलं जात असतानाच अजित पवार गटानं सोलापुरात मोठा डाव खेळलाय. शरद पवार गटातील दोन बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

माजी महापौर यू एन बेरिया आणि माजी महापौर नलिनी चंदेले यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केलाय. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालाय. दोन माजी महापौरांसह इतर पक्षातील नेत्यांनीही प्रवेश केलाय.

पुण्यासह धुळ्यातही शरद पवार गटाला मोठा धक्का

पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. अजित पवार आणि शरद पवार यांच्या युतीला विरोध करत प्रशांत जगताप यांनी शरद पवार गटाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर धुळ्यात शिंदखेडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कामराज भाऊसाहेब निकम यांनी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे.

दोन दिवसापूर्वी पक्षप्रवेश केला आहे. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. या निर्णयामुळे शिंदखेडा तालुक्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेना नकोच! जिल्हा परिषद निवडणुकीआधी जोरदार राडा, भाजप कार्यकर्त्यांचा मंत्री, आमदारांना घेराव घालण्याचा प्रयत्न

Homemade Pizza Recipe: वीकेंडला घरी करा स्पेशल पिझ्झा पार्टी, अगदी रेस्टॉरंटस्टाइल येईल चव

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये ईव्हीएमविरोधातील आंदोलन पेटलं! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर पेटवली

Maharashtra Politics: भाजप-ठाकरे गटाची युती होणार? भाजपची शिवसेनेला नवी 'ऑफर', नेत्यांच्या गुप्त भेटी सुरू

शिक्षक ते BMC नगरसेवक! उमेदवारी अर्ज भरायला खिशात पैसा नव्हता; ओवैसींनी ताकद दिली, तरुणाने निवडणूक जिंकून दाखवली

SCROLL FOR NEXT