Vitthal Rukmini wedding on the occasion Video  SaamTv
महाराष्ट्र

सोन्याचं बाशिंग, लगीन देवाचं लागलं; पंढरीत विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा थाटात संपन्न, हजारो भक्तांची मांदियाळी, पाहा Video

Pandharpur Vitthal Rukmini Marriage Ceremony: दरवर्षी वसंत पंचमीच्या निमित्ताने येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या विवाह सोहळ्यासाठी राज्यभरात हजारो भाविक पंढरीत आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर (पंढरपूर) : या पंढरपुरात... बाई वाजत गाजत..., सोन्याचं बाशिंग, लगीन देवाचं लागलं... या पारंपारिक लोकगीतावर ठेका धरत आज शेकडो महिला व भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याचा याची देही याची डोळा आनंद लुटला.यावेळी देव ब्राम्हणांच्या साक्षीने व सात मंगलाष्टकांनी देवाचा विवाह लावण्यात आला.

श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आज विठु रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या थाटामोठात आणि तितक्याच भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरात विविध प्रकारच्या आकर्षक फुलांची साजवट करण्यात आली होती. देवाच्या विवाह सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.

दरवर्षी वसंत पंचमीच्या निमित्ताने येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या विवाह सोहळ्यासाठी राज्यभरात हजारो भाविक पंढरीत आले होते. श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या उत्सव मुर्तीला वधू-वराप्रमाणे मौल्यवान पारंपारिक अलंकार आणि भरजरी पोशाख परिधान करून देवाला सजवण्यात आले होते. दुपारी १२ वाजता देवाच्या लग्नाची मंगल घटीका समीप आल्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणीच्यामध्ये देव ब्राम्हणांनी अंतर पाठ धरला. त्यानंतर सात मंगलाष्टका म्हणून देवाच्या अंगावर तांदुळ आणि फुलांचा वर्षाव करण्यात आला.

अनुराधा शेट यांनी रुक्मिणी स्वयंवर या कथेवर आधारीत गायिलेल्या गीतांवर उपस्थितीत महिलांनी ठेका धरुन सभा मंडपातच फेर धरुन आपला आनंद द्विगुणीत केला. दरम्यान विवाह सोहळ्यापूर्वी विठ्ठलाच्या अंगावर मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजा करून गुलाल टाकण्यात आला. तर व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते सपत्नीक देवाची पूजा करण्यात आली.

विवाह सोहळ्यानंतर मंदिर समितीच्या वतीने उत्सव मूर्तीची पूजा केली. त्यानंतर वऱ्हाडी भाविकांसाठी पंचपक्वनांचा जेवणाचा बेतही केला होता. त्यानंतर विवाह सोहळ्याची सांगता झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे झाला चौघांचा मृत्यू, डोकाडिया कुटुंबीयांची हत्या की आत्महत्या? प्रकरणात धक्कादायक खुलासा

मोठी बातमी! महाराष्ट्रात नगरपरिषद-नगरपंचायतीचे पोटनिवडणूक जाहीर; मतदान आणि निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक

2029 साली वहिनींनीच मुख्यमंत्री व्हावं, जय पवारांचं मोठं विधान

सुवेंदू अधिकारींच्या पीएची गोळ्या झाडून हत्या, निकालानंतरही बंगलामध्ये हत्येचं सत्र सुरूच

Pune Crime: पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अपरहण करून केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT