Crime News: पैसे दिले नाही तर...; प्रसिद्ध बिल्डरला मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

Former corporator Swapnil Bandekar Case registered in Extortion : बांधकाम व्यावसायिक पवनकुमार गुप्ता यांचे सहकार ग्रुप आणि महावीर ग्रुप नावाने वरळी आणि वसई विरार परिसरात बांधकामाचे प्रोजेक्ट सुरू आहेत.
former corporator Swapnil Bandekar
former corporator Swapnil Bandekar Uddhav Thackeray / Facebook
Published On

पालघर (वसई) :- शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह अन्य तीन जणांवर १० कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह अन्य तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील बांदेकर हे वसई विरार महापालिकेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक आहेत. आकाश पवनकुमार गुप्ता या बांधकाम व्यवसायिकाच्या वरळी येथील आदर्श नगर , सागर दर्शन सोसायटी, येथील प्लॉट नंबर ५ (पार्ट १५) माहीम विभाग, वीर नरीमन नगर वरळी येथील एस.आर.एच्या प्रोजेक्ट्स संदर्भात तक्रार करून, त्या केलेल्या तक्रारीत तडजोड करण्यासाठी १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यावर आहे.

बांधकाम व्यावसायिक आकाश पवनकुमार गुप्ता यांचे सहकार ग्रुप आणि महावीर ग्रुप नावाने वरळी आणि वसई विरार परिसरात बांधकामाचे प्रोजेक्ट सुरू आहेत. गुप्ता यांच्या बांधकामावर केलेल्या सर्व तक्रारी मागे घेण्यासाठी हिमांशू शहा या मध्यस्थीच्या माध्यमातून स्वप्नील बांदेकर यांनी १० कोटींची मागणी केली. जर दिले नाहीत तर सर्व प्रोजेक्ट बंद पाडू अशी धमकी दिली होती. शेवटी तडजोडी अंती दीड करोड रुपयेमध् ही तडजोड करून, २५ लाखाचे टप्पे करून देण्याचे ठरले होते. काल १ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता मिरारोड येथे भेटून ठरलेल्या रकमेतील १५ लाख रुपये देण्याचे ठरले असता, नवघर पोलिसांनी सापळा रचून सदर कारवाही केली आहे.

former corporator Swapnil Bandekar
Sanjay Raut: मुख्यमंत्री फडणवीस 'वर्षा'वर का जात नाहीत? काळी जादू वाल्यांनी उत्तर द्यावं, संजय राऊतांचा हल्लाबोल

नेमकं काय घडलं?

माटुंगा येथे हिमांशू शहा, किशोर आणि आकाश गुप्ता यांची बैठक झाली. त्यावेळी १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दिड कोटीत तडजोड झाली. तक्रारदार २५ लाख देण्यास तयार झाले. त्यातील नोव्हेंबर २०२४ आणि डिसेंबर २०२४ मध्ये दर महिन्याला २५ लाख तर जानेवारी २०२५ पासून ऑक्टोबर २०२५ पर्यंत दर महिन्याला १० लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र गुप्ता पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने त्यांना धमकावण्यात येत होते. अखेर त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

former corporator Swapnil Bandekar
पर्यटकांसाठी खुशखबर! ४१ बोगदे अन् २१ पूल, मुंबईहून गोव्याला ६ तासात टच्च; 'हा' महामार्ग ठरणार गेम चेंजर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com