Sanjay Raut: मुख्यमंत्री फडणवीस 'वर्षा'वर का जात नाहीत? काळी जादू वाल्यांनी उत्तर द्यावं, संजय राऊतांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis Varsha Bungalow: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगला या निवास्थानी राहायला का जात नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
Sanjay Raut
Sanjay RautSaam Tv News
Published On

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वर्षा बंगल्यावरून टीकेचे बाण सोडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगला या निवास्थानी राहायला का जात नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. वर्षा बंगल्यावर काळी जादू झाली आहे का? खरंतर काळी जादू त्यांच्या मनामध्ये असल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.

मुख्यमंत्री होऊनही देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाही? वर्षा बंगल्यावर काळी जादू झाली आहे का? खरंतर काळी जादू त्यांच्या मनामध्ये आहे. देवेंद्र फडणवीस अद्याप मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी राहायला का जात नाही? याचं उत्तर काळी जादू वाले बाबा देतील, असा खोचक टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

Sanjay Raut
Budget 2025: १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट, तरी ४-८ लाख रूपयांवर कर का? संपूर्ण गणित समजून घ्या

एकनाथ शिंदे धक्क्यातून सावरलेले नाहीत

'महायुती एकसंघात नाही. एक वाक्यता नाही. त्यांच्यात एकमेकांविरोधात कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद भाजपच्या नेत्यांनी संपवली असल्याचा टोला संजय राऊत यांनी हाणला. २०२४ विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असे वचन दिल्यानंतरच ते शिवसेनेतून फुटले असल्याचं त्यांनी खासगीत सांगितलं'.

'मी खोटं बोलत नाही, हवं तर त्यांना जाऊन विचारा, असा खुलासा संजय राऊत यांनी केला. 'पण निवडणुका झाल्यानंतर त्यांना खड्यासारखं बाजूला केलं' असा टोलाही राऊत यांनी लगावला. 'शिंदे यांची देहबोली बरंच काही सांगून जाते. एकनाथ शिंदे शुन्यात आहेत. ते धक्क्यातून सावरलेले नाहीत. इतके विरोधी वातावरण असताना पक्षाला ५०-५५ जागा मिळाल्या कशा, हा पहिला धक्का. भाजपनं दिलेला शब्द पाळला नाही हा दुसरा धक्का. या धक्क्यातून एकनाथ शिंदे हे पूर्णपणे कोलमडलेले आहेत. त्यांची या सरकारमध्ये कोंडी झाली' असल्याचंही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com