Shiv Sena Thackeray group leader Sharad Koli addressing a press conference in Solapur. saam tv
महाराष्ट्र

Solapur News: दत्तात्रय भरणे मामा तुमची गेम करायला बसलेत! हत्येचा कट रचला जातोय, ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Sharad Koli Serious Allegation On Minister Dattatray Bharne: शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दत्तात्रय भरणे कोळी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेत्याने केलाय. त्यामुळे सोलापुरात राजकीय खळबळ उडाली आहे.

विश्वभूषण लिमये

  • ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांचा दत्तात्रय भरणेंवर गंभीर आरोप

  • फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा

  • पत्रकार परिषदेत ऑडिओ रेकॉर्डिंग सादर

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर गंभीर आरोप केला. दत्तात्रय भरणे मामा कोळी यांच्या हत्येचा कट आखत आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी पत्रकार परिषदेत केला आहे. शरद कोळी यांच्या आरोपामुळे सोलापुरातील राजकारणात मोठी खळबळ उडालीय. या पत्रकार परिषदेत त्यांनी एक कॉल रेकॉर्डिंग ऐकवली त्यात एका व्यक्तीने मंत्री भरणे कोळी यांच्या हत्येचा कट रचत असल्याचं सांगितलं.

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर गंभीर आरोप केला. दत्तात्रय भरणे मामा कोळी यांच्या हत्येचा कट आखत आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी पत्रकार परिषदेत केला आहे. शरद कोळी यांच्या आरोपामुळे सोलापुरातील राजकारणात मोठी खळबळ उडालीय. या पत्रकार परिषदेत त्यांनी एक कॉल रेकॉर्डिंग ऐकवली त्यात एका व्यक्तीने मंत्री भरणे कोळी यांच्या हत्येचा कट रचत असल्याचं सांगितलं.

दरम्यान शरद कोळी यांच्या जीवावर वाळू माफिया आणि काही अधिकारी उठलते. त्यांच्याकडून कोळी यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार शरद कोळी यांनी २६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली होती. कोळी वाळू माफियाविरोधात भूमिका घेत असल्यानं माफिया त्यांच्या हत्येचा मारण्याचा कट रचत आहेत, अशी तक्रार शरद कोळींनी आधीच केली आहे. अजित पवार गटाचे काही लोक वाळूच्या ठेक्यांमध्ये आहेत.

याबाबत मला कल्पना आल्यानंतर मी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देखील दिली असल्याचं कोळी म्हणालेत. याआधीही पोलीस सुरक्षा असतानाही दत्तात्रय भरणे यांच्यावर गोळीबार झाला होता. आपल्या जीवाचं काही बरेवाईट झाले तर तर याला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्ह्यातील अधिकारी आणि वाळू माफिया जबाबदार असतील, असं शरद कोळी पत्रकार परिषदेत इशारा दिलाय.

काय म्हणाले शरद कोळी

मला दुपारी साडेतीन वाजता एक कॉल आला होता. फोनवरील व्यक्ती माझा चाहता असल्याचं म्हणत होता. त्यामुळे आपल्याला सुचित करत असं सांगितलं. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माला जीवे मारण्याचा कट रचत आहे त्या फोनवरील व्यक्तीनं सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही वाळूमाफिया आणि अधिकारी हे मला जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार मी २६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली होती.

आता फोनवरून मला इशारा देण्यात आलाय. याबाबत मी सोलापुरातील सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मी वाळूविरोधात भूमिका घेतो म्हणून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान शरद कोळी यांनी फोन रेकॉर्डिंग पत्रकारांना ऐकवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

मुंबईत राजकारण तापलं; निवडणुकीसाठी आतापर्यंत इतक्या उमेदवारांनी अर्ज घेतले, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT