Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur : आईला सांगून महाविद्यालयात गेला अन् घेतला टोकाचा निर्णय; तिसऱ्या मजल्यावरून विद्यार्थ्याने घेतली उडी

Solapur News : प्रीतम हा डी.बी.एफ. दयानंद महाविद्यालयात एमकॉमच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. शिक्षण घेण्यासोबतच प्रीतम हा सावरकर मैदानासमोरील एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये नोकरी करीत होता

विश्वभूषण लिमये

सोलापूर : महाविद्यालयात जात असल्याचे आईला सांगून तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. दरम्यान या घटनेमुळे महाविद्यालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

प्रीतम नीलेश राऊत असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. प्रीतम हा सोलापूरच्या  डी.बी.एफ. दयानंद महाविद्यालयात एमकॉमच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. शिक्षण घेण्यासोबतच प्रीतम हा सावरकर मैदानासमोरील एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये नोकरी करीत होता. महाविद्यालयात असाइनमेंट द्यायची आहे; असे आईला सांगून घरातून तो बाहेर पडला होता. यानंतर त्याने महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. 

तपासासाठी महाविद्यालयात गेले असता बसला धक्का  

दरम्यान प्रीतम घरात न दिसल्याने त्याच्या वडिलांनी घरात विचारणा केली. यावेळी त्याच्या आईने महाविद्यालयात गेल्याचे सांगितले, मात्र त्याला फोन लावून पहिला असता फोन स्विच ऑफ येत होता. यामुळे वडिलांची चिंता वाढल्याने ते कॉम्प्युटर सेंटरच्या ठिकाणी गेले. तेथेही आला नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर महाविद्यालयामध्ये आई-वडिलांनी शोध घेतल्यावर त्यांना नवीन इमारतीवरून कोणीतरी पडल्याची माहिती मिळाली. दोघेही घटनास्थळाकडे गेले असता त्या ठिकाणी त्यांचा मुलगा प्रीतम असल्याचे आढळून आले.

सुसाईड नोटमध्ये मागतील सर्वांची माफी 

दरम्यान प्रीतम राऊत याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्याच्याजवळ हि चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये त्याने माझ्या कृत्याला मी स्वतः जबाबदार आहे. मी ज्या काही पैशाची उसनवारी केली आहे, ती त्यांना परत करावी. मी माझ्या आई- वडिलांची, नातेवाईकांची आणि मित्रांची माफी मागतो. आय वॉन्ट फ्रिडम.. अशा उल्लेख चिठ्ठीत आहे. पोलिसांनी हि चिठ्ठी जप्त केली असून याबाबत सोलापुरातील जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

SCROLL FOR NEXT