Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur : सोयाबीनच्या बीलापोटी मिळालेला चेक बँकेत भरल्यानंतर चोरीला; दुसऱ्याच खात्यावर वटला ४ लाखाचा चेक

Solapur News : तब्बल ४ लाख रुपयांचा चेक बँकेत जमा केला. यानंतर हा चेक त्याच्याच खात्यावर जमा होणे अपेक्षित असताना अनोळखी माणसाच्या नावावर जमा झाल्याचा प्रकार घडला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : शेतातून काढणी केलेल्या सोयाबीनची विक्री केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला सोयाबीनच्या बिलापोटी चार लाख रुपयांचा चेक मिळाला होता. हा चेक बँक खात्यात टाकण्यासाठी शेतकरी गेल्यानंतर सदरचा चेक बँकेत भरल्यानंतर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे बँकेतून चोरी झालेला चार लाखाचा चेक संबंधित चोराने वटवला आहे. 

सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. तर मूळचे बार्शीतील असलेल्या उत्तम दत्तात्रय जाधव या शेतकऱ्यासमोर नवे संकट उभे राहिले आहे. उत्तम जाधव या शेतकऱ्याने सोयाबीन विक्री केल्यानंतर शेतकऱ्याच्या नावाचा तब्बल ४ लाख रुपयांचा चेक बँकेत जमा केला. यानंतर हा चेक त्याच्याच खात्यावर जमा होणे अपेक्षित असताना अनोळखी माणसाच्या नावावर जमा झाल्याचा प्रकार घडला आहे. 

बँकेत चेक भरला नसल्याचा कांगावा 

हा प्रकार लक्षात आल्यानंतर बँकेकडून उडवाउडवी करण्यात आली. यात सुरुवातीला संबंधित शेतकऱ्याने बँकेत चेक भरला नसल्याचा कांगावा बँकेकडून केला गेला. मात्र सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर बँकेने चूक मान्य केली. मात्र सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेकडून शेतकऱ्याला पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. 

शेतकऱ्याची पोलिसात तक्रार 

गेल्या सात ते आठ दिवसापासून संबंधित राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्याला टोलवाटोलवी सुरु आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी उत्तम जाधव यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली आहे. तर दुसरीकडे बँकेच्या अधिकाऱ्यांकडून मात्र चौकशी सुरू असल्याचं कारण देत शेतकऱ्याला हेलपाटे मारायला लावत आहेत. यामुळे या शेतकऱ्याला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT