सोलापूर : सोलापूरमधील व्यापाऱ्यांनी वर्षभरात ६९ कोटी ३५ लाख रुपयांची उलाढाल करत तब्बल १० कोटी ८३ लाखांचा जीएसटी बुडविला आहे. जीएसटी भरण्यात अनियमितता केल्याचे उघड झाले आहे. त्यांनी खोटी खरेदी दाखवत जीएसटी बुडवला असून या प्रकरणी एसआरएल ऑइल इंडिया प्रा. लिमिटेडच्या दोन व्यापारी भावांना सोलापूर जीएसटी विभागाने अटक केली आहे. अशा प्रकारे जीएसटी बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक करण्यात आल्याची हि पहिलीच घटना आहे.
श्रीकांत लड्डा आणि लक्ष्मीकांत लड्डा अशी अटक करण्यात आलेल्या व्यापारी भावंडांची नावे आहेत. दरम्यान ८ जानेवारीला दिवसभर ही कारवाई सुरु होती. या दोन्ही व्यापाऱ्यांची २० जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठाडीत रवानगी करण्यात आली आहे. श्रीकांत आणि लक्ष्मीकांत लड्डा हे भाऊ एका छोट्या खोलीत बनावट कंपन्यांकडून व्यवहार करत होते. त्यांनी ६९ कोटी ३५ लाखांची उलाढाल केली. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रजिस्टरमध्ये आवक - जावक नोंदी ठेवल्या नाहीत.
पाच वर्ष केले व्यवहार
मध्य प्रदेशातील इंदूर, गुजरात मधील नावसाणा, सुरत, अहमदाबाद, दमण आणि दीव, मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे आदी ठिकाणी या दोन्ही भावांनी व्यवहार केले आहेत. हा प्रकार २०१९-२० ते २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या कालावधीत घडला आहे. श्रीकांत आणि लक्ष्मीकांत लड्डा यांना वारंवार बोलावूनही ते सुनावणीस हजर राहिले नाहीत. त्यामुळे जीएसटी कोल्हापूर विभागाच्या आयुक्तांची परवानगी घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.
जामीन अर्ज फेटाळला
सोलापुरात जीएसटी विभागाकडून अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलिसांच्या मदतीने या दोन्ही व्यापारी भावांना ताब्यात घेतले आहे. एम आणि जीएसटी कायदा २०१७ नुसार 132 (1) (बी) आणि (सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी लड्डा बंधू यांनी आंतरिम जमीनासाठी अर्ज केला होता. मात्र प्रकरण गंभीर असल्याने दोघांचाही आंतरिम जामीन सोलापूर न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.