>> भारत नागणे, पंढरपूर
Plastic Rice Found In School Nutrition: राज्यात एकीकडे विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचिंत आहेत, तर दुसरीकडे पोषण आहार म्हणून दिला जाणारा तांदूळ भेसळयुक्त असल्याची बाब समोर आली आहे. सोलापूरच्या सांगोल्या तालुक्यातील घेरडी गावात शालेय पोषण आहार म्हणून दिलेल्या तांदूळात चक्क प्लास्टिकचे तांदूळ आढळून आले आहेत.
या धक्कादायक प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सांगोला तालुक्यातील घेरडी गावातील महिला सरपंचांनी हा प्रकार समोर आणला आहे. या भेसळयुक्त तांदळामुळे शाळकरी मुलांचे आरोग्य आले धोक्यात आले आहे.
शालेय पोषण आहारासह रेशनच्या दुकानांमध्ये देखील प्लास्टिकचा तांदूळ भेसळयुक्त दिला जात असल्याचा संशय आता येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. घेरडीच्या सरपंच सुरेखा पुकळे यांनी भेसळयुक्त तांदळाचा प्रकार पुराव्यासह उघडकीस आणला आहे. या प्रकरामुळे सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Solapur News)
या भेसळ युक्त तांदळामुळे शाळकरी मुलांचे आरोग्य आले धोक्यात आले असून मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सरपंच सुरेखा पुकळे यांनी केली आहे.
दरम्यान राज्यातील जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळामधील आठवीपर्यंतचे ८८ लाखाहून अधिक विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची बातमी साम टीव्हीने सोमवारीच दिली होती. पोषण आहाराचा पुरवठा मागील सुमारे दोन महिन्यापासून बंद असल्यामुळे राज्यातील अनेक शाळांमध्ये खिचडी शिजलेली नाही. (Latest Marathi News)
असे असताना आता तांदूळात भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रशासन शाळकरी मुलांच्या आयुष्याशी खेळ करत असल्याच्या भावना पालकांकडून व्यक्त केल्या जात आहे. तसेच सरकारने तात्काळ या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.