Samruddhi Mahamarg Accident Report: समृद्धी महामार्ग बनला मृत्यूमार्ग! 100 दिवसात झाले 900 अपघात

Mumbai-Nagpur Expressway: राज्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी हा मार्ग बनवण्यात आला खरा मात्र आता तो मृत्यूचा मार्ग बनला आहे.
Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg Accident saam tv
Published On

>>संजय डाफ, नागपूर

Accidents On Samruddhi Mahamarg: मुंबई ते नागपूर प्रवासातील अंतर कमी करण्यासाठी तसेच मराठवाडा-विदर्भच्या विकासालाही चालना मिळावी यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र आता हाच समृद्धी महामार्ग मृत्यू मार्ग बनला की काय असे चित्र निर्माण झाले आहे. कारण गेल्या 100 दिवसांत य महामार्गावर तब्बल 900 अपघात झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Expressway) सुरु झाल्यापासून शंभर दिवसात या मार्गावर नऊशे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये आतापर्यंत 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अजूनही या मार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे.

Samruddhi Mahamarg Accident
Bhaskar Jadhav : शिवसेनेची तोफ भास्कर जाधव विधानसभेत दिसणार नाहीत? पायऱ्यांना नमस्कार करुन निघाले; नेमकं काय घडलं? VIDEO

समृद्धी महामार्गावर वाहन चालकांचं वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात होत असल्याचे बोलले जात आहे. राज्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी हा मार्ग बनवण्यात आला खरा मात्र आता तो मृत्यूचा मार्ग बनला आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. (Latest Marthi News)

Samruddhi Mahamarg Accident
Maharashtra Politics: विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या लग्नाची चर्चा! फडणवीसांच्या कोपरखळीला आदित्य ठाकरेंचा विनोदी पलटवार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा आणि विदर्भ मुंबईशी जोडण्याच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाची संकल्पना आणली होती. या मार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवासातील अंतर कमी होण्यासह मराठवाडा आणि विदर्भच्या विकासालाही चालना मिळेल असा या महामार्गाचा उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com