Solapur News
Solapur News Saam tv
महाराष्ट्र

पैसे कमविण्यासाठी ७० हजाराला विकायचा पिस्तूल; क्रेझ म्हणून विकत घेणे पडले महागात

विश्वभुषण लिमये

सोलापूर : घरफोडीतील गुन्हेगार प्रविण राजा शिंदे हा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन सोलापुरात आल्यानंतर त्याला एमआयडीसी पोलिसांनी (Police) एसव्हीसीएस प्रशालेसमोर सापळा रचून मोठ्या शिताफीने पकडले. त्‍याच्‍याकडून क्रेझ म्हणून पिस्तूल विकत घेणाऱ्यांना तिघांनाही पोलिसांनी सातारा (Satara) जिल्ह्यातून ताब्यात घेतले. ते चौघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. (solapur news pistol to sell for Rs 70 thousand to earn money police arrested)

प्रविण शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर अनेक घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. चोरी, घरफोडी करतानाच त्याने देशी बनावटी पिस्तूल स्वस्तात विकत घेऊन ज्यादा पैशाने विकायचा अवैध व्यवसाय सुरु केला होता. (Madhya Pradesh) मध्यप्रदेशातून २० ते २५ हजार रुपयाला पिस्तूल विकत घेऊन तो सातारा जिल्ह्यातच विक्री करीत होता.

पिस्‍तूल, काडतूसासह ताब्‍यात

दरम्यान, प्रविण शिंदे हा सोलापुरातील (Solapur) एका तरूणाला पिस्तूल विकायला येत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अक्कलकोट रोडवरील एसव्हीसीएस प्रशालेसमोर सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे प्रविण शिंदे हा दुचाकीवरून आला. त्याचवेळी पोलिसांनी त्याला पकडले आणि अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे एक देशी बनावटीची पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस आढळली. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयाच्या माध्यमातून पोलिस कोठडी मिळवली. त्यानंतर अधिक तपास केला आणि आतापर्यंत तिघांना अशा प्रकारची तीन पिस्तूल विकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT