Sharad Pawar Solapur Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar Solapur: शरद पवार पुन्हा 'पावसात'; सहकाऱ्याला दिलेला शब्द पाळला अन् भर पावसात लावली लग्न समारंभाला हजेरी (पाहा व्हिडिओ)

Solapur News: शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले

विश्वभूषण लिमये

Sharad Pawar In Rain: २०१९ च्या निवडणुकीदरम्यान साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे भाषण देत असताना अचानक पावसाने हजेरी लावली. त्यावेळीही शरद पवारांनी पावसाचा विचार न करता, पावसात भाषण केलं.

त्यानंतर राज्यात या सभेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगू रंगली होती. इतकेच नाही, तर शरद पवार यांचे या सभेचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते.आता सोलापुरात शरद पवार हे पुन्हा एकदा पावसात भिजले आहेत. या निमित्ताने त्यांच्या भिजण्याची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. (Latest Marathi News)

शरद पवार यांनी शब्द दिला आणि तो पाळला नाही असं कधीच झालं नाही, मग परिस्थिती कोणतीही असो. शरद पवारांनी सोलापुरातील (Solapur) आपल्या सहकाऱ्याच्या दिलेला शब्द पाळला आणि भर पावसात एका लग्नाला हजेरी लावली. शरद पवारांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा केली जात आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी नव वधू आणि वारला शुभ आशीर्वाद दिला. सोलापूर शहराचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा आज पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित राहणार होते. मात्र अचानक लग्न सोहळ्या दरम्यान पाऊस (Rain) सुरू झाला आणि साऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र भर पावसात देखील शरद पवार यांनी या लग्नाला (Marriage) हजेरी लावली.

शरद पवार हे पंढरपूर, सांगोला दौरा आटोपून सोलापुरात रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. कार्यकर्ते शरद पवार यांच्यासाठी पावसात उभे असल्याचे पाहताच त्यांनी आपले वाहन थांबवून पावसात भिजत कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. सोलापूरमधल्या शरदचंद्र पवार कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात सपाटे परिवाराचा विवाह संपन्न झाला. शरद पवार विवाह स्थळावर येताच कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला. (Solapur News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

SCROLL FOR NEXT