Solapur Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Solapur Bajar Samiti : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठी आवक; दोन दिवस लिलाव राहणार बंद

Solapur News : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा कालावधी वाढविला आहे. या कांदा निर्यातबंदीमुळे राज्यातील अनेक बाजारपेठेत कांदा लिलाव बंद होते

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची यंदाच्या वर्षातील रेकॉर्डब्रेक आवक झाली आहे. यात आज (Solapur) सोलापूरच्या बाजारात जवळपास १५०० पेक्षा जास्त कांद्याच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. यामुळे कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचे भाव घसरणार असल्याची भीती आहे. (Tajya Batmya)

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा कालावधी वाढविला आहे. या कांदा निर्यातबंदीमुळे राज्यातील अनेक बाजारपेठेत कांदा लिलाव बंद होते. त्यामुळे आवक वाढल्याची शक्यता आहे. कांदा निर्यात होत नसल्याने कांद्याने भरलेले कंटेनर उभे आहेत. यामुळे (Farmer) शेतकरी चिंतेत आहे. बाजार समितीमध्ये देखील आवक अधिक होत असल्याने कांद्याची ढेसर पाहावयास मिळत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. यामुळेच सोलापूरच्या बाजारात आज कांद्याला २ हजार रुपयाच्या आत भाव मिळण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोलापूर बाजार समितीत एकाच दिवसात सुमारे दीड हजार कांद्याच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. यामुळे बाजार समितीचे कांद्याबाबतचे नियोजन कोलमडले आहे. वाढलेल्या कांद्याची आवकमुळे कांदा लिलाव दुपारी होणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ज्यादा कांदा झाल्यामुळे भाव घसरणार असल्याची चिंता असून शेतकऱ्यांनी दाखल केलेला कालचा कांदा आज लिलावात असेल. यामुळे उद्या आणि परवा बाजार समिती कांदा लिलाव बंद राहण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

SCROLL FOR NEXT