Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur : तडिपारीच्या नोटिसीला आव्हान; गुन्हेगाराला हायकोर्टाने सुनावला एक लाख रुपयांचा दंड

Solapur News : सोलापूर शहरात विविध गुन्हे दाखल असलेल्या इब्राहिम कुरेशी याच्यावर तडीपारिची कारवाई करण्यात आली होती. मात्र या नोटिस विरोधात हायकोर्टात धाव घेत आव्हान दिले होते

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सण, उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारी प्रवुत्तीच्या व्यक्तींना तडीपार करण्याची कारवाई करत असतात. अशाच प्रकारे सोलापुरात तडीपारीची नोटीस बजावल्यानंतर या नोटिसीला सराईत गुन्हेगारांकडून आव्हान दिले होते. मात्र या आव्हानावर निर्णय देताना कोर्टाकडून संबंधिताला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात हा प्रकार घडला असून इब्राहिम खाजासाब कुरेशी असे सराई गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर सोलापूर शहरात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून शहरातील गुंडांची साफसफाई सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून सण, उत्सवाच्या काळात जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार इब्राहिम कुरेशी याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करत नोटीस देण्यात आली होती.

नोटीस विरोधात हायकोर्टात धाव 

दरम्यान इब्राहिम कुरेशी याने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या तडीपारीच्या नोटीस विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. परंतु सोलापुरात तडीपारीच्या नोटिसीला आव्हान देणाऱ्या या गुन्हेगाराला न्यायालयात धाव घेणे चांगलेच महागात पडले आहे. कोर्टाने यावर उत्तर देताना कुरेशी यास एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

वेळ वाया घातल्याचा ठपका 

कुरेशी याने हायकोर्टात धाव घेतल्यानंतर रिट पिटीशन दाखल करताना याचिकाकर्त्याने न्यायालयापासून वस्तुस्थिती लपवल्याचे समोर आले आहे. तर हायकोर्टाने अमूल्य वेळ वाया घालवण्याचा निष्कर्ष काढून कुरेशी यास तब्बल एक लाखांचा दंड ठोठावला आहे. सदर आरोपीकडून एक लाख दंडाची रक्कम एक महिन्याच्या आत भरणे बंधनकारक अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना महसूल कायद्याने रक्कम वसूल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT