Solapur news  Saam tv
महाराष्ट्र

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Solapur news : सोलापूरामध्ये पूरग्रस्तांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकानं दौरा केला... मात्र याचं दौऱ्यावेशी पथकानं केलेल्या दिखाव्यावरून विरोधकांनी चांगलचं रानं उठवलयं... हा पाहाणी दौरा कसा चर्चेत आला? दौऱ्यावेळी पथकानं कशी पाहाणी केली? पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

राज्यात अतिवृष्टीनं हाहाकार माजवला आणि आपला बळीराजा पुरता उद्धवस्त झाला. मदतीच्या प्रतिक्षेत पिचलेल्या शेतकऱ्याच्या नजरा या केंद्र सरकारच्या मदतीकडे असतांना केंद्राच्या पाहणी पथकानं शेतकऱ्यांच्या जखमांवर केवळ मीठच नाही तर मीठासोबत मिर्च्या चोळण्याचा दृष्टपणा केलाय. होय होय होय. रात्रीच्या अंधारात या विद्वानांनी नुकसानग्रस्त भागातील पिक पाहणी केलीये.

पाहा नेमकं काय घडलं?

केंद्रीय पथक सोलापुरातील मोहोळमध्ये दाखल झाले. इथे सीना नदीच्या पाण्यानं नुकसान झालेल्या कोळेगावात पाहणीची जबाबदारी या पथकावर होती. ही पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाला रात्रीचा मुहूर्त सापडला. सगळ गावं झोपेत असतांना काळ्या कुट्ट रात्रीत काजवे आणि वटवाघळांच्या साक्षीनं बॅटरी आणि मोबाईलच्या टॉर्च वापरत केंद्रीय पथकानं हा पाहणीचा देखावा केला.

केंद्रीय पथकाच्या या रात्रीच्या पाहणी दौऱ्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. इतक्या अंधारात आणि घाईघाईत पिक पाहणी दौरा का आटोपला असा सवाल उपस्थित झाल्यानंतर आता प्रशासनानं लगेचच सारवासारव सुरु केलीये.

तर दुसऱ्यांदा अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेलेल्या उद्धव ठाकरेंनीही केंद्रीय पथकाच्या घाईघाईत केलेल्या पाहणीवर टीकेची झोड उठवलीय.

महाराष्ट्रात आभाळ फाटलं आणि शेतकरी पुरता हतबल झालाय. तरीही बळीराजा जगण्यासाठी अस्मानी संकटासोबत दोन हात करत जगण्याचा संघर्ष करतोय. परंतू सुलतानीचं काय? कारण रात्रीच्या अंधारात येऊन नुकसानीची पाहणी करणारे सरकारी सुलतानांनी शेतकऱ्यांची चेष्ठाच केलीये. अशी काय घाई झाली होती की काळ्या कुट्ट अंधारात हा पीक पाहणी दौरा आटपावा लागला हा सवाल अनुत्तरीत्तच आहे. आता या निर्दयी कोडग्यांवर सरकारनं कारवाई करत शेतकऱ्यांना दोन्ही हातानं भरभरून मदत देऊन त्यांच्या दुखावर फुंकर घातलीच पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT