Solapur News Big blow to Uddhav Thackeray Shiv Sainik Sainath Abhangrao resigned from Shiv Sena saam tv
महाराष्ट्र

Shivsena News: ठाकरे गटाला मोठा धक्का; कट्टर शिवसैनिकाने सोडली साथ, शिंदे गटात प्रवेश करणार?

Solapur Shivsena News: शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकाने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.

Satish Daud

Solapur Shivsena News

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मैदानात उतरून नव्याने पक्षउभारणीला सुरुवात केली आहे. शिवसेना सोडून गेलेले अनेक माजी आमदार तसेच पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करीत आहेत. मात्र, तरी देखील शिवसेनेतील आऊटगोईंग काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकाने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.  (Latest Marathi News)

सोलापूर येथील (Solapur News) उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात काय चालय असं म्हणत अभंगराव यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर साईनाथ अभंगराव हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे

शिवसेना ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) उपनेतेपदी सोलापूर जिल्ह्यातील शरद कोळी यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर सोलापूर, पंढरपूर या भागातील जून्या व निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये धुसफूस वाढली आहे. यातूनच अभंगराव यांनी शरद कोळीच्या निवडीवर आक्षेप घेत राजीनामा दिला आहे.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर शरद कोळी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर कोळी यांनी शिंदे गटाच्या अनेक नेत्यांसह केंद्रीय मंत्री नारायण राणे आमदार नितेश राणे यांना‌ थेट अंगावर घेत टिका केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.

सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी पात्रातून होणाऱ्या वाळू तस्करीच्या विरोधात ही सातत्याने आवाज उठवला होता. पोलीस संरक्षण असताना कोळी यांच्यावर खंडणी मागणीचे गुन्हे दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर कोळी यांना लगेचच पक्षाचे प्रवक्तेपद देण्यात आले. त्यानंतर नुकतेच त्यांना उपनेतेपदावर बढती मिळाली.

परंतु त्याच्या या बढतीला सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी जोरदार विरोध दर्शवित थेट पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. साईनाथ अभंगराव हे शिवसेनेत ४० वर्षांपासून कार्यरत आहेत. ‘शरद कोळी हे उपनेते म्हणून आपण सहन करणार नाही, सध्या मातोश्रीवर चालले तरी काय?’, असा सवाल उपस्थित करत अभंगराव यांनी थेट मातोश्रीवर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Rajgira Paratha Recipe : श्रावणात उपवासाला करा झटपट राजगिऱ्याचे पराठे, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; ५७ बंधारे पाण्याखाली | VIDEO

Menstrual Care: मासिक पाळीच्या वेळी स्तन दुखतात? जाणून घ्या यामागील हार्मोनल बदल आणि उपाय

Pune Crime: पिंपरीमध्ये धर्मांतराचा प्रयत्न, गलेलठ्ठ पैशांचं आमिष, अमेरिकन नागरिकाला अटक

SCROLL FOR NEXT