big blow to BJP four former corporator resignation will join to brs Saam TV
महाराष्ट्र

Solapur News: सोलापुरात भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्यासह ४ माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम

Solapur Political News: सोलापूरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. भाजपचे ४ माजी नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Politics News: राज्यात एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आला असताना दुसरीकडे सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूरमध्ये (Solapur News) भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. भाजपचे ४ माजी नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकला आहे. हे चारही नगरसेवक तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.

भाजपचे (BJP) दिवंगत नेते ,माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र,माजी नगरसेवक नागेश वल्याळ तसेच संतोष भोसले,राजश्री चव्हाण आणि जुगनबाई आंबेवाले यांनी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे पाठविले आहेत.

विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी आवर्जून नागेश वल्याळ यांच्या घरी जाऊन भेट दिली होती. त्यावेळेसच नागेश वल्याळ यांच्या बीआरएस मध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं.

अखेर आता नागेश वल्याळ यांच्यासह भाजपच्या ४ माजी नगरसेवकांनी भाजप शहराध्यक्षांकडे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. १९९७ पासून महापालिकेवर सलग पाचवेळा निवडून गेलेले, महापालिका स्थायी समितीचे, सभापती आणि सभागृहनेतेपद सांभाळलेले सुरेश पाटील यांच्याकडे भूमिकेकडेही लक्ष वेधले आहे.

सुरेश पाटील सोलापूमधील भाजपचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी ३० वर्षांपूर्वी दिवंगत नेते लिंगराज वल्याळ यांचा हात धरून भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु मागील २०१७ साली महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजी वाढली आणि सुरेश पाटील हे पक्षाचे आमदार विजय देशमुख यांच्यापासून दूर गेले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT