Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : बार्शी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले; चांदनी नदीला महापूर, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

Solapur Barshi News : दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्याची दैना झाली असून शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाचा तडाखा बसत आहे. यात बार्शी तालुक्याला मोठ्या प्रमाण पाऊस होत असून पुन्हा एकदा तालुक्याला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे पिंपरी साकेत गावाला जोडणारा पूल ओव्हर फ्लो झाला असून येथील रहदारी बंद झाली आहे. तर तालुक्यातील चांदनी नदीला देखील महापूर आल्याने हजारो हेक्टर शेत जमीन पुराच्या पाण्याखाली गेली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा फटका बसला आहे. यामुळे तालुक्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर पिंपरी साकेत गावाला जोडणाऱ्या पुलावरून भोगावती नदीचे पाणी वाहत असताना एका दुचाकीस्वाराने पाण्यात गाडी घातली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुचाकीस्वार वाहून जातं होता, मात्र पिंपरी साकेत गावच्या ग्रामस्थ्यांनी प्रसंगावधान दाखवत पाण्यात वाहून जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे प्राण वाचवले आहेत. 

आठ गावांना मोठा फटका 

बार्शी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर आला आहे. यामुळे मांडेगाव, कांदलगाव, देवगावसह ८ गावातील हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेले आहेत. तसेच कांदलगावात प्राथमिक आरोग्य केंद्रासह नरसिंह मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. चांदणी नदीने रौद्र रूप धारण केले असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

अक्कलकोट - वागदरी रस्ता बंद
दरम्यान जिल्ह्यातील गेली चार दिवसापासून अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अक्कलकोट मध्ये देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे अक्कलकोट - वागदरी रस्ता रहदारीसाठी बंद झाला आहे. अक्कलकोटच्या शिरसी येथील पुलावरून ३ ते ४ फूट पाणी आल्याने रस्ता बंद झाल्याने अक्कलकोट - वागदरी रस्ता बंद असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंची नवी रणनीती? ठाकरेसेना देणार नव्या चेहऱ्यांना संधी, VIDEO

Trikadasha Yog: आज 18 वर्षांनंतर बुध-यम बनवणार त्रिएकादश योग; करियरमध्ये होणार चांगली प्रगती, पैसाही मिळणार

Lucky zodiac signs: कार्तिक शुक्ल अष्टमीचा शुभ संगम; या राशींसाठी धार्मिक कार्य, मानसिक स्थैर्य आणि आर्थिक लाभाचे संकेत

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT