Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Barshi : बार्शीतील व्यापाऱ्याची प्रामाणिकता; ज्वारीच्या पोत्यात सापडलेलं चार तोळे सोनं केलं परत

Solapur News : शेतकऱ्याने ज्वारीच्या पोत्यात सोन्याचे काही दागिने ठेवले होते. हे दागिने काढण्याचा विसर पडल्याने विक्री केलेल्या ज्वारीच्या पोत्यात चुकून गेलेले सोनं या व्यापाऱ्याने स्वतःहून परत केले आहेत

विश्वभूषण लिमये

सोलापूर : आजच्या व्यवहारप्रधान जगात जेव्हा पैशाचं आणि सोन्याचं आकर्षण वाढतंय. सोन्याचे दर देखील गगनाला पोहचले असून खरेदी करणे आता आवाक्याबाहेर गेले आहे. अशात व्यापाऱ्याला विक्री केलेल्या ज्वारीच्या पोत्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व्यापाऱ्याने प्रामाणिकता दाखवत शेतकऱ्याला परत केले आहेत. यामुळे शेतकऱ्याच्या जीवात जीव आला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे हा प्रकार घडला आहे. शेतकऱ्याने काढून ठेवलेली ज्वारी आता व्यापाऱ्याला विक्री केली होती. या ज्वारीच्या पोत्यात सोन्याचे काही दागिने ठेवले होते. हे दागिने काढण्याचा विसर पडल्याने विक्री केलेल्या ज्वारीच्या पोत्यात चुकून गेलेले सोनं या व्यापाऱ्याने स्वतःहून परत केले आहेत. व्यापाऱ्याच्या या प्रामाणिक पणाच्या कृतीतून समाजात आदर्श निर्माण केला आहे.

ज्वारीच्या पोत्यात चार तोळे सोनं 

बार्शी बाजार समितीत शेतकरी लक्ष्मण कात्रे यांनी ज्वारी विक्रीसाठी पोती आणली होती. तपासणी दरम्यान व्यापारी अमोल कानकात्रे यांना त्या पोत्यात चार तोळे सोनं सापडलं. सोन्याचे दर सध्या तब्बल सव्वा लाखाच्या घरात पोहचले आहेत. असे असताना देखील व्यापारी कानकात्रे यांनी कोणताही मोह न ठेवता ते सोनं परत करण्याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्याचा शोध घेऊन सोनं केले परत 

व्यापारी यानंतर कानकात्रे यांनी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकरी लक्ष्मण कात्रे यांचा शोध घेतला. शेतकऱ्याचा पत्ता मिळाल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत सोनं शेतकऱ्याला परत देण्यात आलं. त्या क्षणी शेतकरी भावूक झाला. तर उपस्थित व्यापारी आणि नागरिकांनी या प्रामाणिक कृतीचं जोरदार कौतुक केलं जातं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : कामात धोका पत्करल्यास अडचणी येऊ शकतात; ५ राशींच्या लोकांनी कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, अन्यथा...

India vs New Zealand 3rd ODI: विराट कोहलीचं शतक व्यर्थ; टीम इंडियाचा इंदूर वनडेमध्ये दारूण पराभव,न्यूझीलंडने रचला इतिहास

धाड धाड...! मुंबई हादरली, भररस्त्यात तरुणांकडून गोळीबार; नागरिक दहशतीत

Maharashtra Live News Update: भावनिक मुद्दे हरले, विकास जिंकला - एकनाथ शिंदे

ZP निवडणुकीआधी मोठी उलटफेर; राष्ट्रवादीमध्ये पुन्हा भाकरी फिरणार, संघटनेत नव्या नियुक्त्या होणार

SCROLL FOR NEXT