Amravati : मनोरंजनाचा परवाना घेत भरवला जुगार अड्डा; पोलिसांची धाड टाकत कारवाई, १५ नागरिक ताब्यात

Amravati News : कौसल्या सदनमधील कारगील क्रीडा व मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष हे त्यांच्या मनोरंजन क्लबमध्ये क्लबचे सभासद व्यतिरीक्त इतर इसमांना बोलावून मनोरंजन क्लबचे नावाखाली अवैधरित्या जुगार खेळ चालवित आहे
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: शहरातील कौसल्या सदनमध्ये कारगिल क्रीडा व मनोरंजन क्रीडा या नावाने मनोरंजन क्लब चालविण्याचा परवाना घेण्यात आला होता. मात्र या ठिकाणी मनोरंजन क्लब न चालविता येथे एक्का बादशहा नावाचा जुगार अड्डा चालवून पैशाचा खेळ खेळविला जात होता. या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली असून याठिकाणाहून १५ नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

अमरावतीच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांना गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली होती. प्रशांत नगरमधील कौसल्या सदनमधील कारगील क्रीडा व मनोरंजन मंडळचे अध्यक्ष रमेश्चंद्र गारोडे व उपाध्यक्ष अरविंद मनवर हे त्यांच्या मनोरंजन क्लबमध्ये क्लबचे सभासद व्यतिरीक्त इतर इसमांना बोलावून मनारंजन क्लबचे नावाखाली अवैधरित्या (एक्का बादशाहाचा जुगार खेळ चालवित आहे. या माहितीवरून २३ ओक्टोम्बरला पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली.   

Amravati News
Crime News : जुन्या वादातून जीवघेणा हल्ला; पायावरून गाडी नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण

१ लाख ४३ हजाराचा मुद्देमाल जप्त 

सदर ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने पाहणी केली असता काही इसम मंजीपत्यावर कॉईनच्या माध्यमातून एक्का बादशाह नावाचा जुगार खेळ खेळतांना दिसून आले. या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून जुगाराचे नगदी ५९ हजार ५०० रूपये तसेच जुगार साहीत्य असा एकूण १ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला. 

Amravati News
Crime News : मुळशी पॅटर्न; दारवलीतील घटनेने खळबळ, गायींच्या गोठ्यात आढळला युवकाचा मृतदेह

१५ जणांवर गुन्हा दाखल 

सदरच्या कारवाईत पोलिसांनी क्लबचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचेसह १५ इसमांना ताब्यात घेतले आहे. अमरावती शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५९ हजार रुपये नगदी जप्त करण्यात आले. कौसल्या सदनमध्ये चालणाऱ्या कारगील कीडा व मनोरंजन क्लबच्या नावाखाली अवैध जुगारावर गुन्हे शाखेने कारवाई करून पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com