Solapur Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: सोयरीक जमविण्यासाठी जात असलेल्‍या परिवारावर काळाचा घाला; ट्रक– कार अपघातात तिघांचा मृत्‍यू

सोयरीकसाठी जात असलेल्‍या परिवारावर काळाचा घाला; ट्रक– कार अपघातात तिघांचा मृत्‍यू

विश्वभूषण लिमये

सोलापूर : कर्नाटकातील इंडी येथून आळंदला जात असताना ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यात तिघांचा जागीच मृत्‍यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे. (Maharashtra News)

अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे हा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील इंडी येथून परिवार गुलबर्गा जिल्ह्यातील आळंदी येथे सोयरीक पाहण्यासाठी जात होते. कार शिरवळ येथे पोहचली असता समोरून भरधाव वेगात येत असलेल्‍या ट्रकने समोरून धडक दिली. यात कारचा चक्‍काचूर झाला आहे.

मृतामध्‍ये महिला व बालकाचा समावेश

शिरवळ येथे झालेल्‍या भीषण अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्‍यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांची ओळख पटलेली नसून मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि लहान बालकाचा समावेश आहे. तर अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

Elphistone Bridge: मध्य रेल्वेवर ६ दिवस मेगा ब्लॉक; लोकलचं वेळापत्रक बदलणार; तुमच्यावर काय परिणाम होणार?

IPL 2026: पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; चेन्नईची थेट सहाव्या स्थानावर, पहिल्या नंबरवर कोण?

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या मेळघाटात मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला अपघात,दोन मजुरांचा मृत्यू

Haldi Yellow Saree Designs: हळदीला नव्या नवरीने ट्राय करा या सुंदर ट्रेंडी पिवळ्या साड्या, पाहा ७ युनिक डिझाईन्स

SCROLL FOR NEXT