Solapur Yatra News Saamtv
महाराष्ट्र

Solapur News: चर्चा तर होणारचं! सोलापूरच्या यात्रेत 'सोन्या' बैलाची हवा; रोजचा खुराक अन् किंमत पाहून डोळे फिरतील

Solapur Latest News: सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा सध्या सुरू आहे. यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात खिलार जातीचा सोन्या बैल आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Yatra News:

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा सध्या सुरू आहे. या यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात शेतीची अवजारे, विविध पीके, फळे यासोबतच पशुधनही पाहायला मिळत आहे. या सर्वांमध्ये खिलार जातीच्या सोन्या बैल आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. काय आहे या सोन्याची खासियत अन् किती आहे त्याची किंमत जाणून घ्या सविस्तर.

सोलापूर शहरात (Solapur) श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे 'सोन्या बैल'. सोन्या हा भारतातील सर्वात उंच आणि देखणा खिलार जातीचा बैल असल्याचा दावा त्याच्या मालकाने केला आहे. ६.३० उंच आणि ९.३० फूट लांबी असलेल्या या सोन्याची किंमतही त्याच्या नावाप्रमाणेच सोन्यापेक्षा महाग आहे.

५ वर्षाच्या सोन्याची किंमत ४१ लाख..

सांगलीचे (Sangli) डॉ.विद्यानंद अवटी हे या सोन्या बैलाचे मालक आहेत. अवघ्या ५ वर्षांचा असलेल्या या सोन्याची बाजारभावामध्ये ४१ लाख रुपये इतकी त्याची किंमत आहे. मात्र करोडोमध्ये जरी किंमत मिळाली तरी सोन्याला विकणार नसल्याचे त्याच्या मालकांनी सांगितली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोन्याचा रोजचा खुराक

या सोन्याचा जसा रुबाब अन् थाट आहे. अगदी तसाच त्याचा खुराकही दणकट आहे. सोन्याला दररोज ७ प्रकारच्या कडधान्यांची भरड, २ लिटर गीर गायीचे दूध, २ किलोमीटर शेंगा पेंड, २०० मिली करड्याचे तेल, ०६ गावरान अंडी, दिवसातून ५ ते ६ वेळा वैरण असा त्याचा रोजचा रतीब आहे. इतकेच नव्हेतर सोन्या बैलाला दररोज गरम पाणी आणि शांम्पूने अंघोळही घालावी लागते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकची घटना ताजी असताना संभाजीनगरात टेम्पो विहिरीत कोसळला|VIDEO

Maharashtra Live News Update: जय पवार यांचा बारामतीत जनता दरबार सुरू

Belly Fat Tips: सुटलेलं पोट कमी करायचंय? हे पदार्थ खाणं आत्ताच टाळा

Shocking: लग्नाच्या हॉलमध्ये 'गंदाकाम', ४१ खोल्यांमध्ये ८० तरुण अन् तरुणींना नको त्या अवस्थेत पकडलं; पोलिसांनी छापा टाकताच...

Sudden Weight Gain: कमी खाऊनही वजन वेगाने वाढतंय? या ५ गोष्टी असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT