Sangli News: सांगलीत ऊस आंदोलनाला यश, शेतकऱ्यांना विनाकपात मिळणार 3175 रुपये दर

Sugarcane Agitation in Sangli: सांगली जिल्ह्यातील ऊस दर तोडगा अखेर मिटला आहे. आज प्रशासन, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याची बैठकीत हा निर्णय झाला आहे.
Sugarcane Agitation in Sangli
Sugarcane Agitation in SangliSaam TV
Published On

>> विजय पाटील

Sugarcane Agitation in Sangli:

सांगली जिल्ह्यातील ऊस दर तोडगा अखेर मिटला आहे. आज प्रशासन, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याची बैठकीत हा निर्णय झाला आहे. साखर कारखान्यांनी विनाकपात 3175 रुपये दर देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ऊस आंदोलनाला यश मिळाले आहे.

कोल्हापूर फॉर्मुल्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातही उसाला दर मिळावा या मागणीसाठी गेल्या अनेक महिने आंदोलन सुरू होते. त्या आंदोलनात स्वतः राजू शेट्टी सहभागी होऊन काटा बंद आंदोलन सुद्धा करण्यात आली. यानंतर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी दर जाहीर केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sugarcane Agitation in Sangli
Shetkari Aakrosh Morcha: अमोल कोल्हे यांनी मोर्चा का काढला? जयंत पाटील यांनी सांगितलं नेमकं कारण

मात्र उर्वरित साखर कारखान्याने दर मान्य नसल्याने हे आंदोलन चालूच राहिले होते. यानंतर प्रशासनाने साखर कारखानदार शेतकरी संघटना यांच्यात बैठक बोलावली. (Latest Marathi News)

दोन बैठकीनंतर आज हा तोडगा निघाला आहे. कारखानदारांनी 3175 रुपये दर देण्याचं जाहीर केले आहे. तर दुष्काळी पट्ट्यातील साखर कारखान्याने 3100 दर देण्याचं याआधीच जाहीर केले आहे. त्यामुळे या आंदोलनाला यश मिळाला आहे.

Sugarcane Agitation in Sangli
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीत 'विधानसभा पॅटर्न'; भाजपनं आखली खास रणनीती

साडे बारा टक्के रिकव्हरीच्या वर आहे. त्या साखर कारखान्यांना विना कपात 3175 रुपये दर देण्याचे निश्चित केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आले यश. यापुढे उसाची काठामारी, इथेनॉलची लढाई सुरूच राहणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com