Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Solapur Result: काँग्रेसचा बालेकिल्ला नेस्तनाबूत, मिळाली फक्त १ जागा; सोलापूरवर भाजपचा झेंडा, कारणं काय?

Solapur Corporation Election Result: सोलापूर महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळाले. भाजपने सोलापूरमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ करून टाकला. काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळाला.

Priya More

Summary -

  • सोलापूर महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता

  • सोलापूरमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला

  • फक्त १ जागेवर काँग्रेसचा विजय

  • पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांना यश

विश्वभूषण लिमये, सोलापूर प्रतिनिधी

सोलापूर महानगर पालिकेमध्ये भाजपने काँग्रेसला जोरदार झटका दिला. गेली अनेक वर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर महानगर पालिकेवर भाजपने झेंडा फडकावला. सोलापूरमध्ये काँग्रेसला फक्त एकच जागा मिळवण्यात यश आले आहे. काँग्रेसच्या या पराभवाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

सोलापूरमध्ये १०२ जागांसाठी निवडणूक पार पडली होती. भाजपने ७३ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना शिंदे गटाला ४ जागांवर यश मिळाले. तर एमआयएमचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट, मनसेला याठिकाणी एकही खातं उघडता आले नाही.

सोलापूर महापालिकेचा विजय उत्सव साजरा करण्याकरता ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे हेलिकॉप्टरने सोलापुरात आले. बोराटवाडी निवासस्थानाहून सोलापूरला हेलिकॉप्टरने ते पोहोचले. सोलापुरात भाजपच्या नेतृत्वाची धुरा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. आज सोलापुरात भाजपने एक हाती सत्ता मिळवत सोलापूर महापालिकेवर आपला झेंडा फडकावला. या विजयानंतर सोलापूरमध्ये भाजपने एकच जल्लोष केला.

सोलापूरमध्ये भाजप विजयाची ५ कारणे -

१) सोलापूर महानगर पालिका निवडणुकीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्येच तळ ठोकला होता. पाच महिन्यांपासून रणनिती आखली.

२) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच भाजपने सोलापूरमध्ये स्वबळाचा नारा दिला होता.

३) भाजपने मायक्रो प्लॅनिंग करत सोलापूरमध्ये अबकी बार ७५ पारची घोषणा केली होती.

४) विरोधी पक्ष नावाला ठेवलाच नाही. शिंदेसेना, अजित पवारांची राष्ट्रावादी, काँग्रेसमधील दिग्गजांना आधीच भाजपात घेतले.

५) जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि सचिन कल्याणशेट्टी यांनी पूर्णपणे प्लान करून सोलापूरमध्ये विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update: अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाचा दणदणीत विजय

Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेचा निकाल लागताच दोन मोठे निर्णय; बिल्डरांचे धाबे दणदणार

महाराष्ट्राच्या राजकारणात MIM ची दमदार एन्ट्री; १२० हून अधिक उमेदवार जिंकल्याचा दावा, काँग्रेसलाही पडले भारी

Celebrity Divorce: प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोडला संसार; 23 महिन्यांनी घेतला काडीमोड

ऐनवेळी प्रभाग बदलला आणि अखेरच्या क्षणी ठाकरेंच्या माजी महापौराचा दणदणीत विजय|VIDEO

SCROLL FOR NEXT