"मुख्यमंत्र्यांचं जाऊद्या मरू द्या...!'' पालकमंत्री भरणेंची जिभ घसरली Saam Tv
महाराष्ट्र

"मुख्यमंत्र्यांचं जाऊद्या मरू द्या...!'' पालकमंत्री भरणेंची जिभ घसरली

पालकमंत्री दत्ता भरणे यांनी हे विधान केलं आहे. परंतू त्यानंतर त्यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर महानगरपालिकेच्या (Solapur Muncipal Corporation) वतीने 'माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पाच मधील देगाव रोड येथे 43 एकर जागेवर गटनेता आनंद चंदनशिवे यांच्या भांडवली निधीतून वीस हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्‍तामामा भरणे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचे भरभरुन तोंडभरुन कौतुक केलं आहे.

त्यानंतर पालकमंत्रा दत्ता भरणे यांनी बोलायला सुरुवात केली. महापौरांशी बोलताना दत्ता भरणेंची जिभ घसरली आणि म्हणाले "मुख्यमंत्र्यांचं जाऊद्या मरू द्या, आपल्या निधीतून गार्डन तयार करू" या विधानाने सोलापुरमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, त्यानंतर पालकमंत्री दत्ता भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांविषयीचे विधान अवधानाने तोंडून निघावे असे दत्ता भरणे म्हणाले आहेत. त्याचा विपर्यास करु नये असे सांगत मंत्री भरणे यांनी दिलगिरी व्यक्त करत असल्याचा व्हिडियो व्हायरल झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railway : रेल्वेची आरक्षण यादी ८ तास आधी जाहीर होणार | VIDEO

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या नादाला लागू नको नाहीतर पटकनी काय आहे ते दाखवू-राऊतांचा दुबेंना इशारा

Bribe Case : प्रसूती रजा मंजुरीसाठी मागितले ३६ हजार; मुख्याध्यापिकेसह लिपिक ताब्यात

CM Fadnavis: मीरा भाईंदर मोर्चाला परवानगी का दिली नाही? CM फडणवीसांनी सांगितलं कारण; मनसेवर डागली तोफ

भयंकर! रेल्वेची स्कूल बसला जबर धडक, ३ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

SCROLL FOR NEXT