msrtc bus 
महाराष्ट्र

एसटी कर्मचारी संप; प्रवाशांचे हाल, महामंडळाचे २२ काेटींचे नुकसान

साेलापूर जिल्ह्यात खासगी वाहनांच्या अपघाताच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या (msrtc) कर्मचा-यांनी साेलापूर जिल्ह्यात अद्याप त्यांचा संप कायम ठेवला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे सुमारे २२ काेटींचे नुकसान झाले आहे. अद्याप या विभागातील नऊ आगारातील सुमारे ३ हजार फे-या रद्द हाेताहेत. (solapur msrtc empolyee continues strike)

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनिकारण व्हावे या मागणीसाठी पुकारलेल्या संपला आता महिना झाला आहे. या काळात महामंडळाच्या जिल्ह्यातील नऊ डेपोतून गाड्यांच्या होणाऱ्या तीन हजार फेऱ्या थांबल्या आहेत. यामुळे दररोज ७५ लाखांचा तोटा दररोज महामंडळाला सहन करावा लागत आहे.

गेल्या महिनाभरात सोलापूर एसटी महामंडळाचे तब्बल २२ कोटी ५० लाखांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे प्रवाशांचे खूप हाल होताहेत. याबराेबरच खासगी वाहनांच्या अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान सोलापूर आगारातील २८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. याबराेबरच २९६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे अशी माहिती विभागीय कर्मचारी वर्गाकडून मिळाली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10 Hour Work Rule: पुढे सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! १० तासांची शिफ्ट, ५ दिवसांचाच आठवडा

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'चा बॉक्स ऑफिसवर जलवा; 'लाइफ इन अ मेट्रो'चा रेकॉर्ड ब्रेक, वाचा संडे कलेक्शन

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

मित्र शूट करत राहिले अन् रीलस्टारचा बुडून मृत्यू, तो रील अखेरचा ठरला, भंडाऱ्यात खळबळ

Horoscope Monday Update : अचानक हाती येईल पैसा, वाचा आजचे खास राशीभविष्य

SCROLL FOR NEXT