Solapur Barshi Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : "...तो तुझा मामा आहे" शेजारच्या तरुणासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिलं; मुलीला मांडीवर बसवलं अन्...

Solapur Barshi Crime News : सोलापूर येथे ६ वीतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. शेजाऱ्यासह पीडित मुलीच्या आईविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून पोलीस सखोल तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • सोलापुरात ६ वीतील विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना

  • शेजाऱ्यासह पीडितेच्या आईविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा

  • आरोपी आणि आई अटकेत; पोलिसांचा तपास सुरू

  • घटनेमुळे परिसरात संताप आणि खळबळ

सोलापूरमध्ये ६ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे शेजारच्या तरुणाने हे कृत्य केले असून या कारस्थानामध्ये पीडितेच्या आईचा देखील हात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपी आणि पीडित मुलीच्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी रोजी पीडीतेचे वडील कामावर आणि भावंड बाहेर गेले असता आरोपीने घरात येऊन सदर मुलीला बळजबरीने मांडीवर बसवत लैंगिक शोषणाचा प्रयत्न करून विनयभंग केला. यासंदर्भात पीडित मुलीने आईला माहिती दिली असता. 'तो तुझा मामा आहे, काय होत नाही' असे म्हणत मुलीला गप्प केले.

आरोपी एवढ्यावरच न थांबता पुन्हा दुसऱ्या दिवशी पीडितेच्या घरी गेला. त्याने मुलीच्या आईसमोरच तिचे गाल पकडत अशील वक्तव्य केले. तरीही आईने दुर्लक्ष करत आरोपीला प्रोत्साहन दिले आणि मुलीला गप्प बसण्यास भाग पाडले. तसेच अल्पवयीन मुलीने आरोपी आणि आईला नको त्या अवस्थेत पाहिले. त्यावेळेस आरोपीने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.

घाबरलेल्या मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली. तिच्या जबाबावरून मुख्य आरोपी आणि पीडितेची आई यांच्या विरोधात पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून आईच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT