Malshiras Akash Khurd murder case mother reaction Saam Tv News
महाराष्ट्र

Solapur Crime : माझ्या तरण्याबांड लेकाची हाल हाल करुन हत्या; पीडित आईची आर्त हाक, म्हणाली...

Solapur Malshiras Murder Youth : माझ्या लेकाच्या मारेकऱ्यांना शोधून फाशी द्या, त्यांनाही तसेच हाल हाल करुन शिक्षा द्या, अशी आर्त हाक पीडित आईने माध्यमांसमोर बोलताना दिली आहे.

Prashant Patil

सोलापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडांने महाराष्ट्र पुरता हादरुन गेला होता. आत सोलापूर जिल्ह्यातही अशीच हादरवून टाकणारी घटना घडली. पिलीव माळशिरस रस्त्यावरील निर्मनुष्य जंगलात एका तरुणाचा अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी एका तरुणाचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह आढळून आला असून नग्न मृतदेहावर क्रूर मारहाणीचे आणि गरम सळईने चटके दिल्याचे निशाण दिसून आले. अशा क्रूर पद्धतीने एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने सोलापूर जिल्हा हादरला आहे. माझ्या लेकाच्या मारेकऱ्यांना शोधून फाशी द्या, त्यांनाही तसेच हाल हाल करुन शिक्षा द्या, अशी आर्त हाक पीडित आईने माध्यमांसमोर बोलताना दिली आहे.

आकाश अंकुश खुर्द असं हत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो पिलीव येथे आपली विधवा आई पत्नी आणि सात महिन्याच्या मुलासह राहत होता. मंगळवारी त्याला कोणाचा तरी फोन आला आणि तो घराबाहेर पडला. मात्र, पहाटे त्याची क्रूर हत्या करून त्याचा मृतदेह या जंगलात टाकण्यात आला होता. मृतदेहाशेजारीच त्याची दुचाकी खाली पडलेल्या अवस्थेत होती, त्याच्या नग्न मृतदेहाशेजारी पडलेल्या त्याच्या कपड्यातून महत्त्वाचा पुरावा असणारा मोबाईल गायब झाला होता. सकाळी ग्रामस्थांना ही घटना कळल्यावर गावात बातमी पसरली आणि लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

आपल्या मुलाची हत्या झाल्याची माहिती कुटुंबाला कळल्यावर घरात एकच आक्रोश सुरू झाला. आकाशचा मृतदेह इतक्या भयानक अवस्थेत सापडल्याने कुटुंबीय देखील हादरुन गेलं आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अद्याप अहवाल सादर झालेला नाही. मात्र, या संपूर्ण प्रकारावर पोलिसांनी बोलणं टाळून माध्यमांसमोर बोलणं देखील टाळलं आहे.

मृत आकाशचा मोबाईल हा महत्त्वाचा पुरावा ठरणार असून यावर आलेले फोन कोणाचे होते? यावरून त्याच्या हत्येचा छडा लागू शकणार आहे. पण, त्याचा मोबाइलही गायब आहे. आकाशच्या हत्येमुळे केवळ ७ महिन्याचा मुलगा, विधवा पत्नी आणि विधवा आई आता उघड्यावर आले आहेत. घरातून गेलेल्या माझ्या मुलाचा थेट मृतदेहच घरात आला, माझ्या लेकास मारहाण करणाऱ्यांना देखील तसंच हाल हाल करुन शिक्षा द्या, अशी मागणी पीडित आईने केली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT