Farmer from Solapur cheated as Maharashtra Bank mistakenly deposited his soybean bill payment into another person’s account. saam tv
महाराष्ट्र

Solapur News: बँकेचा गजब कारनामा; सोयाबीन बिलाचा चेक एकाचा; पैसे मात्र दुसऱ्याच्याच खात्यावर

Solapur Bank: सोलापूरमधील एका धक्कादायक घटनेतून महाराष्ट्र बँकेचा घोर निष्काळजीपणा उघड झालाय. एका शेतकऱ्याचा सोयाबीन बिलाचा चेक गहाळ झाला. शेतकऱ्याच्या चेकचे पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाले आहेत.

विश्वभूषण लिमये

  • मागील सात ते आठ दिवसापासून शेतकरी बँक ऑफ महाराष्ट्रच्या खेटा मारतायत.

  • उत्तम जाधव यांनी सोलापुरातील एका कंपनीला सोयाबीन विकलं होतं.

  • शेतकऱ्याच्या नावावर पैसे जमा न होता तिसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा आरोप

महाराष्ट्र बँकेच्या भोंगळ कारभार समोर आलाय. सोलापूरमधील शेतकऱ्याचे सोयाबीनचे बिल म्हणून मिळालेला चेक बँकेतून गहाळ झाल्याचा आरोप शेतकऱ्याने केलाय. सोयाबीन बिल म्हणून आलेला चेक शेतकऱ्याच्या नावावर पैसे जमा न होता तिसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा पीडित शेतकऱ्याने केलाय.

उत्तम दत्तात्रय जाधव असं या पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. ते बार्शीतील रहिवाशी आहेत. उत्तम जाधव यांनी सोलापुरातील एका कंपनीला सोयाबीन विकलं होतं, त्याबदल्यात कंपनीने चार लाख रुपयांचा चेक जाधव यांना दिला. शेतकरी उत्तम जाधव यांनी हा चेक सोलापुरातल्या नवी पेठ येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत जमा केला.

मात्र पैसे खात्यावर जमा का झाले नाही याची माहिती घ्यायला गेल्यानंतर चेक बँकेत आढळून आला नाही. याबाबत बँक अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर उत्तम जाधव यांच्या पायाखालची जमिनी सरकली. कारण त्यांच्या नावाने जमा करण्यात आलेल्या चेक तिसऱ्याच व्यक्तीच्या नावाने वटवण्यात आला.

त्याच्या खात्यावर पैस गेल्याची माहिती बँक अधिकाऱ्याने दिली, असं पीडित शेतकरी उत्तम जाधव यांनी दिली. विशेष म्हणजे हे पैसे परत मिळवण्यासाठी पीडित शेतकरी मागील सात ते आठ दिवसापासून बँक ऑफ महाराष्ट्रच्या खेटा मारत आहेत. मात्र बँकेकडून या संदर्भात कोणतीही दखल घेतली जातं नाहीये. या संदर्भात साम टीव्हीने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र बँक अधिकाऱ्यांनी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.

सोलापूर एमआयडीसीमधील एका फूड कंपनीला सोयाबीन विकला. त्यांनी मला ३.९३ लाख रुपायंचा चेक दिला. हा चेक मी नवी पेठ येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत जमा केला. त्याची पोच पावती देखील मला बँकेने दिली. परंतु या चेकचे पैसे माझ्या खात्यावर जमा झाले नाहीत. याची विचारणा केली तर चेक बँकेत गहाळ झाला असं बँक अधिकारी सांगत आहेत. मजुरांचे मजुरी देण्यास आणि मुलाच्या लग्नासाठी आता पैसे नाहीत, असं शेतकरी उत्तम जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar leopard Attack : बिबट- माणसांच्या संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

Latur Shocking : पुण्यानंतर लातूरमध्ये रक्तरंजित थरार; शेतात गाढ झोपलेल्या बाप-लेकाची हत्या, मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ फेकले

Maharashtra Live News Update: धुळे महानगरपालिका आयुक्तांची बदली होताच ठाकरे गटाकडून जल्लोष

Maharashtra Politics: सातारा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; माजी मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT