Praniti Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Praniti Shinde: राम सातपुते यांनी दिलेलं चॅलेंज प्रणिती शिंदे यांनी स्वीकारलं, भाजपवर टीका करत म्हणाल्या...

Solapur Lok Sabha Constituency: सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांनी काँग्रेस नेत्या आणि उमेदवार प्रणिती शिंदे यांना ओपन चॅलेंज दिलं होतं. जे त्यांनी आज स्वीकारलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Solapur Lok Sabha Constituency:

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांनी काँग्रेस नेत्या आणि उमेदवार प्रणिती शिंदे यांना ओपन चॅलेंज दिलं होतं. जे त्यांनी आज स्वीकारलं आहे. राम सातपुते यांनी सिद्धेश्वर मंदिर परिसरात सोलापूरकरांसोबत आज मॉर्निंग वॉक केला. यावेळी त्यांनी प्रणिती शिंदे यांना आपल्या सत्तेच्या काळात सोलापूरकरांसाठी आपण काय केलं, हे सोलापूरच्या कोणत्याही चौकात येऊन सांगा मी यायला तयार आहे, असं म्हणत ओपन चॅलेंज दिलं होतं.

यानंतर प्रणिती शिंदे याही सोलापुरात मॉर्निंग वॉकला आल्या आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, भाजप उमेदवार राम सातपुते यांचे ओपन चर्चेचे चॅलेंज मी स्वीकारते. सोलापूर शहरात भोंगळ कारभार सुरु आहे. दोन वर्षे झाले महापालिकेवर प्रशासक नेमलेला आहे. त्या म्हणाल्या की, ''ओपन चर्चेला मी 100 टक्के तयार आहे. मी इथलीच आहे 24 तास उपलब्ध आहे. मी चॅलेंज स्वीकारलेले आहे निवडणुकीला उभारले तेच माझे चॅलेंज आहे.'' (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्या म्हणाल्या की, ''सोलापूर शहरात भोंगळ कारभार सुरूय. दोन वर्षे झाले महापालिकेवर प्रशासक नेमलेला आहे. शहरात आठ आठ दिवसांनी पाणी येते, येणारे पाणी घाण पिवळ्या रंगाचे असते. रात्री एक दोन वाजता पाणी सोडतात. नगरसेवक नाहीत त्यामुळे निधी नाही झोनमध्ये कोणी नाही'', असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

प्रणिती शिंदे यांचा रिक्षातून प्रचार

दरम्यान, बुधवारी सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी मुद्द्याचं बोला ओ अभियानांतर्गत त्यांनी रिक्षा चालक संघटनेशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ''मागील दहा वर्षात भाजपने आणि त्यांच्या सोलापुरातील खासदारांनी आश्वासना व्यतिरिक्त काहीच दिले नाही. यातून मतदारांची फसवणूक झाली आहे. आता त्यांच्याकडे विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखं काही उरलं नाही म्हणूनच ते विषयांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Beed Tour: अजित पवारांच्या दौऱ्यातील हृदयस्पर्शी दृश्य; चिमुकला कडेवर आणि महिला पोलीस बंदोबस्तावर

Maharashtra Live News Update: PM नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्त पुण्यात खास ड्रोन शो

Daily Horoscope: गोड बातमी मिळणार की ब्रेकअप होणार; प्रेमी जोडप्यांसाठी कसा असेल बुधवारचा दिवस?

IAS Transfer : मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच बदल्यांचे आदेश; राज्यातील २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Pune News: बुधवार पेठेत गेला अन् हौस केली, नंतर पेमेंट अ‍ॅपचा पासवर्डच विसरला; ३ वेश्यांनी चांगलाच तुडवला

SCROLL FOR NEXT