सोलापुरात एक कोटीच्या खंडणीसाठी डॉक्‍टरचे अपहरण, आरोपीना पोलिसांनी ठोकल्या बेड्या विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

सोलापुरात एक कोटीच्या खंडणीसाठी डॉक्‍टरचे अपहरण, आरोपीना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा या ठिकाणी दवाखाना आणि पेट्रोलपंप असणाऱ्या डॉ.अनिल कुलकर्णी यांचे अपहरण

विश्वभूषण लिमये

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा या ठिकाणी दवाखाना आणि पेट्रोलपंप असणाऱ्या डॉ.अनिल कुलकर्णी यांचे अपहरण करून 5 लाख 88 हजार 420 रुपयांना लुटून 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या 7 आरोपींना अटक करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमध्ये 2 लाख 50 हजार रोख रकमेसह 8 लाख 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे प्रॅक्टिस करणारे नामांकित डॉ.अनिल कुलकर्णी हे 21 सप्टेंबर दिवशी रात्री 8.30 वाजता आपल्या वडाळा येथील पेट्रोल पंपाची कॅश घेऊन MH13- BN 9367 या चारचाकी गाडीने सोलापुर शहराकडे जात असताना बीबी दारफळ या ठिकाणी त्यांच्या गाडीला इनोव्हा कार MH42- N 4554 आडवी लावून डॉ.कुलकर्णी यांना गावठी रिव्हॉल्वर लावून त्यांना मारहाण करत या टोळीने त्यांचे अपहरण केले होते. आरोपींनी डॉ.कुलकर्णी जवळील 5 लाख 88 हजार 420 रुपये काढून घेऊन त्यांच्याकडे 1 कोटींची खंडणी मागितली होती.

तसेच त्यांना मोहोळ, पंढरपूर, टेंभुर्णी, इंदापूर, बारामती, जेजुरी- सासवड मार्गे नेऊन वारजे- मळेवाडी पुणे या ठिकाणी ढकलून देऊन निघून गेले होते. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील तपास करत असताना हा गुन्हा वडगाव, सिंहगडरोड, पानमळा पुणे येथील आरोपींनी केल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. या प्रकरणी 5 आरोपींना पुण्यातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा गुन्हा उघड झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी किती वर्षे टिकते? योग्य देखभाल कशी करावी?

Thackeray Brothers : राज-उद्धव ठाकरेंनी दोन्ही पक्ष एकत्र करावेत, विजयी मेळाव्याआधी भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

HPCL Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, पगार २.८ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

SCROLL FOR NEXT